Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: संयम ठेवा! उद्धव ठाकरेंचे आदेश आले; शिवसैनिकांची भूमिका काय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 16:46 IST2022-04-23T16:36:15+5:302022-04-23T16:46:48+5:30
पोलिसांना राणा दांम्पत्याला घेऊन बाहेर जाऊ देणार नसल्यावर शिवसैनिक ठाम आहेत. राणांनी माफी मागावी आम्ही त्यांना बाहेर जाऊ देऊ असे ते म्हणाले.

Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: संयम ठेवा! उद्धव ठाकरेंचे आदेश आले; शिवसैनिकांची भूमिका काय...
नवनीत राणा यांनी मुंबईचे वातावरण, कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला. मातोश्री आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली, यामुळे जोवर ते माफी मागत नाहीत तोवर त्यांना घराबाहेर पडू देणार नाही, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. यातच राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची संख्या वाढू लागली आहे.
या साऱ्या घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश आले आहेत. शिवसैनिकांनी संयम ठेवावा, कोणीही कायदा व सुव्यवस्था हाती घेऊ नये, असे आदेश दिले आहेत. तर पोलिसांनी मोठी कुमक बोलावली असून राणा दांम्पत्याला बाहेर काढण्यासाठी देखील वाहने दाखल झाली आहेत. पोलिसांनी गर्दी कमी करण्यास सांगितले आहे.
तर पोलिसांना राणा दांम्पत्याला घेऊन बाहेर जाऊ देणार नसल्यावर शिवसैनिक ठाम आहेत. राणांनी माफी मागावी आम्ही त्यांना बाहेर जाऊ देऊ असे ते म्हणाले. काहीच वेळात राणा दांम्पत्याला बाहेर काढण्याचे पोलीस प्रयत्न केले जाणार आहेत. नवनीत राणांना केंद्राची सुरक्षा आहे. मात्र ते सुरक्षा रक्षक हाताच्या बोटावर मोजण्याएवढे आहेत. यामुळे पोलीस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी संयमाने परिस्थिती हाताळल्यास राणा सुखरूप बाहेर निघू शकतात.
दुसरीकडे राणांनी आपण माफी मागणार नाही असे म्हटले आहे. माफी मागितल्यानंतर आक्रमक शिवसैनिकांकडून फटाके वाजविण्याची तयारी करण्यात आली आहे.