शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

Coronavirus : कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पहिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 12:59 IST

Covid 19 Second Wave : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तम कार्य करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना मिळाली पसंती.

ठळक मुद्देकोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तम कार्य करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना मिळाली पसंती.ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी ट्विटरच्या माध्यमातून घेतला होता पोल.

सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्ये आपल्या पातळीवरही कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचा आणि नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. याशिवाय सर्वाधिक रुग्णसंख्याही महारातूनच समोर येत होती. परंतु आता राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री कोण असा पोल ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी ट्विटरच्या माध्यमातून घेतला होता. प्रभू चावला यांनी घेतलेल्या पोलनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली आहे असा कल देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांना ६२ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली. शिवसेना समर्थकांकडून या पोलचा स्क्रीनशॉट सध्या व्हायरल करण्यात येत आहे.

कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं? असा प्रश्न प्रभु चावला यांनी ट्विटरच्या पोलद्वारे विचारला होता. त्यांनी दोन पोलद्वारे आठ मुख्यमंत्र्यांची नावं निवडली होती. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केरचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि कर्नाटकचे बी.ए. येडियुरप्पा यांच्या नावांचा समावेश होता.  पहिल्या पोलमध्ये तब्बल २,६७,२४८ जणांनी आपलं मत नोंदवलं. तर दुसऱ्या पोलमध्ये २,३४,२६१ जणांनी आपलं मत नोंदवलं. पहिल्या पोलमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ६२.५ टक्के, तर योगी आदित्यनाथ यांना ३१.६ टक्के, पिनराई विजयन यांचा १.३ टक्के आणि अरविंद केजरीवाल यांना ४.६ टक्के मतं मिळाली.तर याच प्रश्नावर आधारित असलेल्या दुसऱ्या पोलमध्ये शिवराज सिंह चौहान यांना ४९ टक्के, तर नवीन पटनायक यांना ४८.८ टक्के मतं मिळाली. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना १.७ आणि बी.एस.येडियुरप्पा यांना ०.५ टक्के मतं मिळाल्याचं दिसून आलं आहे. या पोलच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री ठरल्याचं शिवसेना समर्थक सोशल मीडियाद्वारे म्हणत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेyogi adityanathयोगी आदित्यनाथKeralaकेरळUttar Pradeshउत्तर प्रदेशMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानPunjabपंजाबdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल