शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राहुल नार्वेकरांविरोधात सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; ठाकरे गटाने ‘रोडमॅप’वर घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 18:29 IST

MLA Disqualification Case In Supreme Court: आमदार अपात्रतेसंदर्भातील पुढील सुनावणीवेळी ठाकरे गटाकडून वेळापत्रकाबाबत बाजू मांडली जाणार आहे.

MLA Disqualification Case In Supreme Court: आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत रोडमॅप सादर करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार, विधानसभा अध्यक्षांच्या वतीन सर्वोच्च न्यायालयात रोडमॅप सादर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या रोडमॅपवर आक्षेप घेत थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती देण्यात आली आहे. 

विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. अपात्रता मुद्दा सोडून इतर विषयात अध्यक्ष वेळ घालवत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचा आहे.  विधासभा अध्यक्षांनी जाहीर केलेले वेळापत्रक आणि होणारा विलंब पाहता ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ०६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीत हा मुद्दा मांडला जाणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयात राहुल नार्वेकरांविरोधात प्रतिज्ञापत्र

ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी ठाकरे गटाकडून हे प्रतिज्ञापत्र दाखल केले. विधानसभा अध्यक्षांनी जे वेळापत्रक जाहीर केले आहे, त्यात होणार विलंब पाहता ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून, यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना वेळापत्रक सादर करण्यासाठी दोन आठवड्यांना वेळ देण्यात आला होता. त्यावर ३ ऑक्टोबरला सुनावणी करण्यात येणार होती, पण ही सुनावणी ६ ऑक्टोबर या दिवशी ढकलण्यात आली.

दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी नुकतीच २५ सप्टेंबरला आमदार अपात्रतेप्रकरणी प्रत्यक्ष दुसरी सुनावणी घेतली. १४ सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी दुसरी सुनावणी  विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली. ठाकरे गटाकडून सर्व दाखल ३४ याचिका एकत्रित करून सुनावणी करा, अशी मागणी करण्यात आली. मात्र, सर्व याचिकांची एकत्रित सुनावणीला शिंदे गटाच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Narvekarराहुल नार्वेकर