शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

“कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिका-महाराष्ट्रात येणार”; ठाकरे गट ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 5:22 PM

काही जण शिंदे गटात गेलेत पण बाळासाहेबांवर प्रेम करणारा निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहे, असा दावा करण्यात आला आहे.

Shiv Sena Thackeray Group: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहेत. मनिषा कायंदे, शिशिर शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दुसरीकडे, पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत. राज्यातून अनेकांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा मिळत आहे. हजारो शिवसैनिक आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत, अशी ग्वाही देत आहेत. अशातच आता कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिका अन् महाराष्ट्रात येणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 

विदर्भ दौऱ्याहून परत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विविध विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत उपस्थित होते. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली, काय झाले, याविषयी  सुनील राऊत यांनी माहिती दिली. बैठकीसाठी बोलावले होते. उद्धव ठाकरेंना पाहिल्यानंतर आम्हाला एक एनर्जी येते. आताही एनर्जी घेऊन आम्ही आमच्या विभागात जाणार आहोत. पुन्हा एकदा शिवसेना मजबूत करण्याचे काम करणार आहोत, असे ते म्हणाले. 

शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिका अन् महाराष्ट्रात येणार

आमच्याकडे कोणीही अस्थिर नाही. आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे निष्ठावान शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे यांनी योग्य मार्गदर्शन केले असून पक्ष मजबूत आहे, संघटनाही मजबूत आहे. शिवसेनेची सत्ता कुठल्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेत आणि महाराष्ट्रात येणार आहे. आपण आपल्या पद्धतीने काम करा. लोकांशी संपर्क वाढवा, असे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिंदे गटात काही जण गेले असले तरी बाळासाहेबांवर प्रेम करणारा निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहे. आमची निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे, त्यामुळे आम्हाला चिंता करायची गरज नाही. जे गेले ते उपरे होते. अशी प्रतिक्रिया सुनिल राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSunil Rautसुनील राऊतMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका