Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा, महाविकास आघाडीने ठरवलं होतं की...”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 19:44 IST2023-03-06T19:41:58+5:302023-03-06T19:44:39+5:30
Maharashtra News: विरोधी पक्षात प्रमुख चेहरे आहेत, त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा, महाविकास आघाडीने ठरवलं होतं की...”: संजय राऊत
Maharashtra Politics: सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला जोरदार लढा देण्यासाठी विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न केले जात आहेत. यातच संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना, संजय राऊत यांना २०२४ लोकसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेनुसार उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर, हे पाहा, याबाबत आता भाकीत करणे तेवढे सोपे नाही. राजकारणात काहीही घडू शकते. उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो
महाविकास आघाडीने ठरवले होते की, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करु. विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. कारण एकतर महाराष्ट्र मोठे राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. याचा विचार भविष्यात आमचे इतर सहकारी करू शकतात, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शेवटी या देशातील मुख्य चेहरा कोणता असेल, यापेक्षा विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पंतप्रधान कोण असेल हे आपल्याला नंतर ठरवता येते. पण आधी एकत्र येऊन निवडणुका लढवणे महत्त्वाचे आहे. सगळ्यांनी एकत्र येण्यावर उद्धव ठाकरेंचा भर आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"