Maharashtra Politics: “राज्यपालांचे वागणे भाजपच्या अंगाशी येतंय, भगतसिंह कोश्यारींची गच्छंती करायचीय, पण...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 12:16 IST2023-01-24T12:15:09+5:302023-01-24T12:16:17+5:30
Maharashtra News: पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी भाजप असा प्रयत्न करत आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

Maharashtra Politics: “राज्यपालांचे वागणे भाजपच्या अंगाशी येतंय, भगतसिंह कोश्यारींची गच्छंती करायचीय, पण...”
Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडीतील वाद शमताना दिसत नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यपालांवर सडकून टीका झाली. राज्यपाल हटाव, अशी भूमिकाही घेण्यात आली. यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.
नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्यपालांचे वागणे भाजपच्या अंगाशी येत असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला.
भगतसिंह कोश्यारींची गच्छंती करायचीय, पण...
राज्यपाल हे जणूकाही हस्तक म्हणून वागत आहेत. असे राज्यपाल कोश्यारी यांचे वागणे भाजपच्या अंगाशी येताना दिसत आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या अशा वागण्याची गच्छंती करायची आहे. पण, असे करताना आपला पक्ष कुठेही डॅमेज होणार नाही, याची काळजी भाजप घेताना दिसून येत आहे. पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी भाजप असा प्रयत्न करत आहे. यापेक्षा राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत वेगळे काही असेल, असे मला वाटत नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
दरम्यान, सगळ्या शक्यता पाहून पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला आहे. सगळ्या बाजूंचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. पक्षनेतृत्वाचा आदेश आम्ही शिवसैनिकांसाठी आहे. त्यामुळे पक्षाची ही भूमिका आम्ही पुढे नेणार आहोत, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीवर सुषमा अंधारे यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"