अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:17 IST2025-11-15T10:14:33+5:302025-11-15T10:17:02+5:30
Shiv Sena Shinde Group News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात राज्यभरातून पक्षप्रवेश होत असल्याचे दिसत आहे.

अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
Shiv Sena Shinde Group News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. तर महाविकास आघाडीही यात मागे नाही. असे असले तरी सर्वच पक्षांत प्रवेशाचे कार्यक्रम सुरू आहेत. अहिल्यानगर आणि तुळजापूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश झाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राहुरी तालुका शेतकरी विकास मंडळाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे रामचंद्र राजुभाऊ शेटे पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच तुळजापूर तालुक्यातील अर्जुन सलगर आणि त्यांच्या असंख्य साथीदारांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
उद्योजक धनुभाऊ घुगरकर, उद्योजक ज्ञानेश्वर टेकाळे, ऍड.भाऊसाहेब पवार, उमेश खिलारी तसेच सरपंच चंद्रकांत आढाव, उपसरपंच सुभाष जुंदरे, श्याम तोडमल, संदीप आढाव, योगेश नालकर, ऍड.चंद्रशेखर शेळके, संदीप बोरुडे, संदीप थोपटे, बाळासाहेब वाघ, आकाश हारदे अशा असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, मुंबई महानगर पालिका निवडणूकीपूर्वी बोरिवली मागाठाणे विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटासह भाजपला मोठे खिंडार पडले आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये ठाकरे गटाच्या शाखा समन्वयक भूषण माळदवेंसह शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे. तसेच भाजपा कांदिवली पूर्व विधानसभा सचिव दिपाली माटे यांनीही शक्तिप्रदर्शन करत शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते सर्व ठाकरेंचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केले.