शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली; जिल्हा परिषद निवडणूक निकालावरुन शिवसेनेचे भाजपावर बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 07:52 IST

नागपूर जिल्हा परिषदेतील पराभवावरुन देवेंद्र फडणवीसांचा समाचार

मुंबई: राज्यातील सत्ता हेच भाजपचं 'टॉनिक' होतं. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे, अशा तिखट शब्दांत शिवसेनेनं जिल्हा परिषदा निवडणुकीतील पराभवावरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. नागपूर जिल्हा परिषदेतीलभाजपाच्या पराजयावरुन शिवसेनेनं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ग्रामीण भागातील जनता तुमच्या रोजच्या 'बकवास' थापेबाजीला कंटाळली आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले आहेत. 'जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपची पीछेहाट झाली आहे. एक धुळे वगळता भाजपच्या चेहऱ्यावरील 'मेकअप' उतरला. सत्तेमुळे आलेली ही लाली सत्ता जाताच उतरली. ज्याच्या हाती बऱ्यापैकी सत्ता असते त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांत विजय होतो. राज्यात सत्ताबदल झाल्याची तुतारी सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निकालांनी फुंकली आहे. नागपूर, नंदुरबार, धुळे, वाशीम, पालघर, अकोला अशा सहा जिल्ह्यांत निवडणुका झाल्या. त्यात धुळ्यात भाजपची निर्विवाद सत्ता आली. येथे शिवसेनेसह महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या गेल्या असत्या तर भाजप येथेही गटांगळ्या खाताना दिसला असता. मावळत्या जिल्हा परिषदेत शिवसेनेची पाटी कोरी होती. आता चार जागांवर विजय मिळाला. नंदुरबार जिल्ह्यात भाजप - काँग्रेस 23-23 असे लोक निवडून आले. येथेही शिवसेनेचा तक्ता कोरा होता. आता सात जागांवर शिवसेना विजयी झाली. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय नंदुरबार जिल्हा परिषदेत कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही. नंदुरबारमध्येही काँग्रेसने थोडे हुशारीने घेतले असते व शिवसेनेसह महाविकास आघाडी म्हणून लोकांसमोर गेले असते तर जिल्हा परिषदेतून भाजपचे नामोनिशाण मिटले असते,' अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपावर तोफ डागली आहे.Exclusive: नागपूर जिल्हा परिषद का गमावली?; फडणवीसांनी सांगितलं राज'कारण''नंदुरबारची सत्ता भाजपने गमावली आहे. त्याचे नैराश्य इतके की, अक्कलकुवा येथील शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला घडवून जाळपोळ करण्यापर्यंत त्यांच्या भाडोत्री गुंडांची मजल गेली. मुळात नंदुरबारसारख्या जिल्ह्यात भाजपचे स्वतःचे असे काही स्थान नाही. राष्ट्रवादीतले विजयकुमार गावीत व इतर 'उपरे' घेऊन त्यांनी जी उधार-उसनवारी केली त्यामुळे तेथे भाजपचे झेंडे लागले. पण कालच्या निवडणुकांतून सत्य काय ते बाहेर आले. मुंबईजवळील पालघर जिल्हा परिषदेतून भाजपची सत्ता गेली आहे. शिवसेनेने येथे आधीचाच आकडा 18 हा कायम ठेवला, पण भाजप 21 वरून 12 वर घसरला. भाजप घसरल्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला व राष्ट्रवादी 4 वरून 14 वर गेली. अकोल्यात वंचित आघाडी, तर वाशीमला राष्ट्रवादीस बऱया जागा मिळाल्या आहेत. या सर्व जिल्हा परिषदांवर कालपर्यंत भाजपची सत्ता होती, पण महाराष्ट्राची सत्ता गमावल्याने जिल्हा परिषदाही रिकाम्या झाल्या,' अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. Exclusive : ...तर सगळं वाईटच होतं, राज ठाकरेंच्या भेटीवरुन नवाबांचा फडणवीसांना टोलानागपुरमधील पराभवावरुन शिवसेनेनं देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींचा जोरदार समाचार घेतला आहे. 'नागपूर जिल्हा परिषदेत फडणवीस व गडकरी यांच्या नाकावर टिच्चून काँग्रेसने मुसंडी मारली आहे. भाजपचा दारुण पराभव फडणवीस, गडकरींच्या गावातच झाला. शिवसेना काँग्रेसच्या रंगात रंगली असून भगवा रंग विसरली असल्याची गरळ गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच ओकली होती. पण नागपूर हा त्यांचा बालेकिल्ला असतानाही फडणवीस-गडकरी तेथील भाजपचा पराभव का थांबवू शकले नाहीत? याचे कारण एकच, ग्रामीण भागातील जनता तुमच्या रोजच्या 'बकवास' थापेबाजीला कंटाळली आहे. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने नागपुरात मुसंडी मारलीच होती व आता जिल्हा परिषदही भाजपकडून हिसकावून घेतली. नागपुरातील पराभव हा सगळ्यात मोठा दणका आहे. नागपुरात जिथे जिथे फडणवीस प्रचाराला गेले तिथे तिथे भाजप उमेदवारांचा पराभव व्हावा, यास काय म्हणावे? नागपुरात 58 पैकी 40 जागांवर काँग्रेस - राष्ट्रवादीने विजय मिळवला हे महत्त्वाचे आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील सत्ता हेच भाजपचे 'टॉनिक' होते. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे. जिल्हा परिषदांचा कौल स्पष्ट आहे. सहापैकी पाच जिल्ह्यातून भाजपला नाकारण्यात आले. भाजप आता काय करणार?', असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस