शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला आम्ही सज्ज; शिवसेनेचं भाजपाला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 22:38 IST

भाजपानं ईव्हीएमसोबतची युती जाहीर केली- शिवसेना

मुंबई: लोकसभेच्या 40 जागा जिंकण्याची वल्गना करुन भाजपानं ईव्हीएमसोबतची युती जाहीर केली आहे, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. लातूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळाचे संकेत दिले. त्यावर शिवसेनेनं तिखट प्रतिक्रिया दिली आहे. अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला शिवसेना कायम तयार असतेच. त्यामुळे येऊ द्या अंगावर, होऊ द्या सामना. हा महाराष्ट्र तुम्हाला अस्मान दाखवल्या शिवाय राहणार नाही, असं थेट आव्हान शिवसेनेकडून भाजपाला देण्यात आलं आहे. आज लातूरमध्ये भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यामध्ये अमित शहांनी त्यांच्या भाषणातून शिवसेनेचा सूचक इशारा दिला. मित्र सोबत आले ठीक, अन्यथा विरोधकांसह त्यांनाही धोबीपछाड देऊ, असं शहा म्हणाले होते. शहांच्या या विधानाचा शिवसेनेनं समाचार घेतला. 'भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमfत शाह यांच्या मस्तवाल आणि उन्मत वक्तव्यावरून त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पर्दाफाश झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील हिंदुंच्या मनातील भावना मांडली आणि हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार असा नारा दिला. हा नारा झोंबल्यामुळेच आणि शिवसेनेच्या आसूड ओढण्यामुळेच भाजपच्या पाया खालची जमीन सरकली आणि आता भाजप नेत्यांच्या जीभदेखील सरकू लागली आहे', अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला. पाच राज्यांमधील पराभवामुळे भाजपाचं अवसान गळाल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. 'भारतीय जनतेनं भाजपाला त्यांची जागा दाखवायला सुरुवात केली आहे. राज्यातील लोकसभेच्या 40 जागा जिंकण्याची वल्गना करुन भाजपानं आपली ईव्हीएमशी युती होणार हे जाहीर केलेच आहे. तसेही त्यांच्या अनिल गोटे नावाच्या आमदारानं धुळे महानगर पालिकेत त्यांचं भांडं फोडलंच आहे. त्यामुळे आता होऊन जाऊ द्या. शिवसेना तसंही अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार असतेच. येऊ द्या अंगावर. होऊ द्या सामना. हा महाराष्ट्र तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही,' अशा धारदार शब्दांमध्ये शिवसेनेनं भाजपाला खुलं आव्हान दिलं आहे. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाहBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९