शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 20:36 IST

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: अत्यंत भयानक परिस्थिती आहे. काही भाग वगळला तर सर्वत्र पाणी दिसत आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: अत्यंत भयानक परिस्थिती आहे. काही भाग वगळला तर सर्वत्र पाणी दिसत आहे. शेतकऱ्यांचे देखील अतोनात नुकसान झालेले आहे. सरसकट तर पंचनामे होतीलच. मात्र, त्यांना आता भरीव मदत सरकार ती देईल. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्यात मुख्यमंत्री काही घोषणा करतील, असे मला वाटते, अशी माहिती राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिली. 

संजय शिरसाट पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाच टक्के निधी यासाठी वापरण्याची मुभा दिलेली आहे. ज्या ठिकाणी रस्ते तुटले आहेत, पुल वाहून गेले आहेत, त्या ठिकाणी तातडीने काम करण्यासाठी आम्हाला वाव मिळाला आहे, गावाला जोडण्याची ही एक संधी आहे, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे. 

आई अंबाबाई देवीचे शिवसेनेसह सर्वांकडे लक्ष आहे

दुसरीकडे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी आई अंबाबाई मंदिरामध्ये देवीचे दर्शन घेतले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबाबाई देवीच्या चरणी महाराष्ट्रावर आलेले महापुराचे संकट दूर करण्याची सरकारला ताकद द्यावी, अशी प्रार्थना केली. महाराष्ट्रावर जेव्हा संकट आले आहे, तेव्हा सरकारने मदत करण्याची भावना ठेवून मदत केली आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सरकारने नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. यावेळी शेतकऱ्यांना पूर्ण दिलासा दिला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी येणाऱ्या काळात बैठका सुरू होतील. आई अंबाबाई देवीचे शिवसेनेसह सर्वांकडे लक्ष आहे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

दरम्यान, सर्व मंत्र्यांनी दौरे केले. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होते. शेतीचे प्रचंड नुकसान होते. जमीन वाहून जाते, तेव्हा साहजिक अशा प्रतिक्रिया उमटतात. दिवाळीपर्यंत बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन आहे. आता तातडीची पाच हजार रुपये, अन्न-धान्य, कपडे, निवारा अशी मदत केली जात आहे. सरकार त्यांच्या पाठीशी आहे. त्याप्रमाणे निर्णय आम्ही घेणार आहोत. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, असे आमचे नियोजन आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Massive farmer losses; Government to provide substantial aid: Sanjay Shirsat

Web Summary : The government promises significant aid to farmers affected by widespread flooding, with announcements expected after tomorrow's cabinet meeting. District funds can be used for immediate repairs to damaged roads and bridges. The government aims to support farmers and ensure a positive Diwali, with immediate relief measures underway.
टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाटShiv SenaशिवसेनाRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी