शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

“उद्धव ठाकरेंना युती नकोच होती, शरद पवारांनी ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 2:56 PM

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जायचेच नव्हते. एकनाथ शिंदे हवे तर तुम्ही बोला, पण मी जाणार नाही, असे उद्धव ठाकरेंनीच तेव्हा सांगितले, असा दावा शिंदे गटाच्या नेत्याने केला आहे.

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. एका सभेत बोलताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने शब्द दिला होता. पण आता खोटे बोलत आहेत, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला. यावर आता शिवसेना शिंदे गटातील नेत्याने पलटवार केला आहे.

तुळजा भवानी देवीची शपथ घेऊन सांगतो की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह खोटे बोलत आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा उद्धव ठाकरेंनी पुन्हा केला आहे. यावर शिवसेना शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी ज्या सभेत अमित शाह खोटे बोलतात असे म्हणाले. त्यांची शपथ खरी आहे. पण पहिली अडीच वर्षे भाजपा आणि नंतरची शिवसेना असे होते. पण त्यांना युती करायचीच नव्हती. शेवटच्या क्षणाला भाजपाने हे मान्य केले कीस आधीची अडीच वर्षे देतो. हे खोटे आहे म्हणून त्यांनी शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान संजय शिरसाट यांनी दिले.

शरद पवारांनी ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती

भाजपासोबत जायचे नाहीच. हवे तर एकनाथ शिंदे तुम्ही बोला पण, मी जाणार नाही. हे यासाठी कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ५ वर्षांच्या मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. प्रश्न नीतिमत्तेच्या असेल तर त्यांनी शपथपूर्वक सांगावे, असे शिरसाट म्हणाले. तसेच जागावाटपावर बोलताना ते म्हणाले की, जागावाटपाबाबतच्या तुमच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. उद्या आणि परवा हे दोन दिवस महत्त्वाचे आहेत, असे शिरसाट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, लाचार माणसांना मी अनेकदा सिल्व्हर ओकवर जाताना पाहिले आहे. लाचार लोक काश्मीरमध्ये जाऊन राहुल गांधीला मिठ्या मारताना पाहिले आहे. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर यांच्या निकालावर टीका करण्याचा जो प्रयत्न केला, हे समजून घेतले पाहिजे की, सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले नाहीत किंवा स्टे आणला नाही. नार्वेकरांनी दरवेळेला त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, राऊतांना जाणीव होती की आपण चुकीची घटना सादर केली आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा