“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:45 IST2025-09-20T18:43:13+5:302025-09-20T18:45:07+5:30
Shiv Sena Shinde Group Deepak Kesarkar News: लोकांनी आम्हाला बहुमत आम्हाला दिलेले आहे. संजय राऊत काय बोलतात याकडे कोणी जास्त लक्ष देऊ नका, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
Shiv Sena Shinde Group Deepak Kesarkar News: ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या विरोधात आम्ही निवडून आलो आहोत. जनमत आमच्या सोबत आहे. लोक आमच्या बरोबर आहेत. लोकांनी आम्हाला बहुमत आम्हाला दिलेले आहे. अशा प्रश्नांना उत्तर देण्यापेक्षा, लोकांच्या कामाला आम्ही जास्त प्राधान्य देतो, असा पलटवार शिवसेना शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला.
प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांचे कर्तृत्व काय, राजन विचारे आधीपासून आमच्या पक्षात आहे. ते निष्ठावान आहेत. राजन विचारे नसते, तर एकनाथ शिंदे नसते. त्यांची वृती हे ओरबाडून घेण्यासारखी आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत काय बोलतात याकडे कोणी जास्त लक्ष देऊ नका
संजय राऊत काय बोलतात याकडे कोणी जास्त लक्ष देऊ नका. काहीही बोलायचे आणि लोकांचे लक्ष वेधायचे. हे आता लोकांना माहिती झाले आहे की, त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नसते. आमचा पक्ष आहे, स्वतःचे चिन्ह आहे आणि बाळासाहेबांचे विचार आहेत. आमची घोडदौड सुरूच राहणार, असे केसरकर यांनी नमूद केले. आम्ही लोकांसाठी काम करत असतो. आम्हाला विधानसभेत मिळालेल्या यशाची तुम्ही चेष्टा करत असाल, तर तुम्ही लोकशाहीची चेष्टा करत आहात. तुम्ही लोकांकडे दुर्लक्ष केले, असे उत्तर दीपक केसरकर यांनी एका प्रश्नावर दिले.
दरम्यान, संजय राऊत यांचे अधिकच प्रेम कोणावर आहे हे सर्वांना माहिती आहे. मी राष्ट्रवादीमध्ये असताना, मी जेव्हा शरद पवार यांना भेटायला जायचो. तेव्हा संजय राऊत तिथे बसलेले असायचे. शिवसेनेला जे काही नुकसान झाले आहे, ते संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे झाले.