शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Sanjay Raut: “PM मोदींच्या तोडीचा राष्ट्रीय नेता नाही, लोकांसमोर पर्यायही नाही”; राऊतांची ‘रोखठोक’ कबुली! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 10:06 IST

Sanjay Raut: पाचपैकी चार राज्ये भाजपने राखली असली तरी आपसमोर नरेंद्र मोदी व अमित शाह टिकू शकले नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई: पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने चार राज्य सहज जिंकली. त्यात उत्तर प्रदेश जिंकल्याचा जल्लोष आजही सुरूच आहे. राष्ट्रीय नेता म्हणून नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आज तरी पर्याय नाही. त्यांच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरातून पाच राज्यातील निवडणुकांचे विश्लेषण करत केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि काँग्रेसला टोले लगावले आहेत. 

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपसाठी प्रचंड यशाचे, तर काँग्रेससाठी निराशाजनक ठरले. पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपा सत्तेत बसणार हे स्पष्ट झाले आहे. पंजाबमधून काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेसच्या कामगिरीवर टीका होत असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निवडणूक निकालांवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी पाच राज्यांमधील निवडणूक निकालांबाबत सामनातील रोखठोक सदरात भूमिका स्पष्ट केली आहे. 

पंजाब राज्यात भाजपचे पूर्ण पानिपत का झाले?

भाजपने पाच राज्यांपैकी चार राज्ये सहज जिंकली. पण सीमेवरील पंजाब राज्यात भाजपचे पूर्ण पानिपत का झाले? त्यावर कुणीच बोलत नाही. आम आदमी पक्षाने दिल्ली ते पंजाब हातपाय पसरले. गोव्यात ते शिरले. हे चित्र काय सांगते?, असे काही सवालही संजय राऊत यांनी केले आहेत. देशाच्या सीमावर्ती राज्यात ‘आप’सारख्या पक्षाने बहुमत मिळवणे हा राष्ट्रीय पक्षाचा पराभव आहे. अत्यंत संवेदनशील असे हे राज्य. दिल्लीच्या केंद्रशासित राज्यावर ‘राज्य’ करणे व पंजाबचा सुभा सांभाळणे यात फरक आहे. दुसरे म्हणजे स्वतः केजरीवाल हे अर्धवट राज्याचे मुख्यमंत्री. त्यांच्याकडे गृह, अर्थ यासारखी खातीच नाहीत. उलट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा मान मोठा असेल. त्यांच्या हातात स्वतःचे पोलीस दल असेल. त्याचा गैरवापर दिल्लीच्या राजकारणात होऊ नये इतकेच, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

‘आप’समोर नरेंद्र मोदी व शहा टिकू शकले नाहीत

भारतीय जनता पक्ष पाच राज्यांतील विजय साजरा करीत आहे, पण त्यांनी आहे ते फक्त राखले. नवे काय मिळवले? उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये त्यांचे राज्य होते, ते राखले. पंजाबात त्यांचा दारुण पराभव झाला व जेमतेम दोन जागा ते जिंकू शकले. येथे केजरीवाल व ‘आप’समोर नरेंद्र मोदी व शहा टिकू शकले नाहीत, असा चिमटा काढत, उत्तर प्रदेशातील वारे भाजपविरोधी वाहात होते. तरी भाजपला मतदान झाले. कारण मतदार नरेंद्र मोदींकडे देशाचे नेते म्हणून पाहतो. त्यांच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही. मोदी निवडणुकांकडे उत्सव म्हणून पाहतात आणि या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. मग हे लोक बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था हे प्रश्न निवडणुकांपुरते विसरून जातात, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. 

दरम्यान, प्रियांका गांधी उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये जरा आधी उतरल्या असत्या, तर परिस्थिती बदलली असती. उत्तर प्रदेशवर भाजपने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले. पण समाजवादी पार्टी ४२ वरून थेट १२५पर्यंत गेली. त्यांचे जवळपास १०० उमेदवार २०० ते ५०० मतांच्या फरकाने पराभूत झाले. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपाला १८ जागा गमवाव्या लागतील, हे आता स्पष्ट झाले आहे. प्रियंका गांधींनी मोदी-शाह यांच्यापेक्षा जास्त मेहनत घेतली. पण त्यांना जागा जिंकता आल्या नाहीत. त्यांनी थोडे आधी मैदानात उतरायला हवे होते. पण आज त्या जे प्रयत्न करत आहेत, त्याचा फायदा त्यांना २०२४मध्ये होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहPoliticsराजकारणcongressकाँग्रेस