शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

... तर ते स्वत:साठीच खड्डा खणतायत; 'भास्कर'वरील आयकर विभागाच्या छाप्यावरून शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 11:35 IST

Daily Baskar Income Tax : भास्कर विभागाच्या कार्यालयांवर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यांवरून उमटत आहेत निरनिराळ्या प्रतिक्रिया.

ठळक मुद्देभास्कर विभागाच्या कार्यालयांवर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यांवरून उमटत आहेत निरनिराळ्या प्रतिक्रिया.

भास्कर समुहाच्या देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. यानंतर याविरोधात देशभरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरकारपुढे झुकण्याची व याचक म्हणून दारात उभे राहण्याची दै. 'भास्कर'ची परंपरा नाही. थोडक्यात, इतर ‘माध्यमां’प्रमाणे ते सरकारचे मिंधे झाले नाही. त्यांनी कोणत्याही सरकारवर अवाजवी टीका केली नाही व गुडघे टेकले नाहीत. बहुधा ‘भास्कर’ किंवा ‘भारत समाचार’चे हे कृत्य कोणाला राजद्रोही वाटले असेल व त्यामुळे त्यांच्या कार्यालयांवर देशभरात छापे मारून वृत्तपत्र क्षेत्रात दहशत माजविण्याचा प्रयोग सुरू केला गेला आहे. असे झाले असेल तर ते स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणत आहेत, असं म्हणत शिवसेसेनं केंद्र सरकारवर टीका केली आहे.

कोरोना मृत्यूच्या आकडय़ात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असेल तर ते हिंदुस्थानी स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे. गेल्या पाच वर्षांत देशातल्या 7 प्रमुख क्षेत्रांत 3.64 कोटी लोक बेरोजगार झाल्याचा लेखाजोखा ठळकपणे मांडणाऱ्या ‘भास्कर’ला सरकारी दमनचक्राखाली दडपून मारता येईल असे कुणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केंद्रावर टीका केली आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ? दैनिक ‘भास्कर’ वृत्तपत्र समूह आणि ‘भारत समाचार’ या वृत्तवाहिनीवर आयकर विभागाचे जोरदार छापे पडले आहेत. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे छापे पडावेत याचे आश्चर्य वाटते. ‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरण गाजत आहे. देशातील 30 पत्रकारांवर पेगॅससच्या माध्यमांतून पाळत ठेवण्यात आली. त्यावरही गदारोळ सुरू झाला आहे. आता वृत्तपत्रांवर छापेही पडले. याआधी असे छापे ‘एनडी टीव्ही’ या वृत्तवाहिनीवर टाकून सरकारने दहशत निर्माण केली होती. ‘भास्कर’ या वृत्तसमूहाचा व्याप मोठा आहे. देशभरात त्यांच्या आवृत्त्या निघतात व त्या लाखोंनी संपतात. हिंदी भाषिक पट्टय़ांत ‘भास्कर’चे जनमानसावर वजन आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक विकले जाणारे वर्तमानपत्र असा दै. ‘भास्कर’चा लौकिक आहे. दै. ‘भास्कर’मधील वार्तांकन हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ, पारदर्शक व तप्त असते. ते संयमी तितकेच सत्यवादी असते. सरकारपुढे झुकण्याची व याचक म्हणून दारात उभे राहण्याची त्यांची परंपरा नाही. थोडक्यात, इतर ‘माध्यमां’प्रमाणे ते सरकारचे मिंधे झाले नाही. 

त्यांनी कोणत्याही सरकारवर अवाजवी टीका केली नाही व गुडघे टेकले नाहीत. बहुधा ‘भास्कर’ किंवा ‘भारत समाचार’चे हे कृत्य कोणाला राजद्रोही वाटले असेल व त्यामुळे त्यांच्या कार्यालयांवर देशभरात छापे मारून वृत्तपत्र क्षेत्रात दहशत माजविण्याचा प्रयोग सुरू केला गेला आहे. असे झाले असेल तर ते स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणत आहेत. आणीबाणी इंदिरा गांधींनी आणली हे खरे, पण त्या व्यवस्थेचा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पडद्यामागे सूत्रे हलविणारे दुसरेच कोणीतरी चांडाळचौकडीचे लोक होते. त्यांच्यामुळे इंदिरा गांधी पुरत्या बदनाम झाल्या. आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? 

दैनिक ‘भास्कर’चे सर्वेसर्वा श्रीमान अग्रवाल यांनीही छापेमारीची पर्वा न करता यापुढेही सत्यासाठी लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. अग्रवाल यांनी परखडपणे सांगितले, ‘आमचा गुन्हा काय? आम्ही फक्त सत्य सांगितले. आम्ही आमचे काम केले. गंगेत वाहत येणाऱ्या प्रेतांपासून कोरोनामुळे झालेल्या मयतांचे खरे आकडे देशासमोर मांडले. आम्ही फक्त इतकेच केले.’ हे सत्य सांगितल्यामुळेच ‘भास्कर’चा तळपता सूर्य झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे काय? ‘भास्कर’शी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरी छापे मारून त्यांचे मोबाईल फोन, लॅपटॉप जप्त केले. ‘भास्कर’ समूहाने करचोरी केली असा आरोप ठेवला आहे, तो खरा आहे असे एकवेळ मान्य केले तरी वृत्तपत्रांवर असे सरकारी हल्ले करून एकप्रकारे दहशत माजविण्याचाच प्रकार आहे. चौकशी व तपास ‘dignified’ पद्धतीने होऊ शकतो, पण अशा प्रकरणात राजकारण घुसले की हे प्रकार घडतात. राजकीय विरोधकांना ईडी, सीबीआयच्या माध्यमांतून छळले जात आहेच, आता सत्य लिहिणाऱ्या वृत्तपत्रांची ‘नखे’ उपटली जात आहेत. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणIndira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेस