शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

शिवसेना, राष्ट्रवादी की काँग्रेस; मविआचा सर्वाधिक फायदा कुणाला? सर्वेतून समोर आली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 10:00 PM

Maharashtra Opinion Poll: एका सर्वेमधून आता निवडणुका झाल्यास राज्यामध्ये Mahavikas Aghadiचे सरकार सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच या महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक फायदा कुठल्या पक्षाचा होईल, याबाबतचेही कल समोर आले आहेत.

मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून भाजपाशी मतभेद झाल्यानंतर शिवसेनेने एनडीएमधून बाहेर पडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा करत महाविकास आघाडीची स्थापना केली होती. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. दरम्यान, आता या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्त झालेल्या एका सर्वेमधून आता निवडणुका झाल्यास राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच या महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक फायदा कुठल्या पक्षाचा होईल, याबाबतचेही कल समोर आले आहेत.

साम टीव्हीने केलेल्या या कलानुसार महाविकास आघाडीचा सर्वाधिक फायदा हा शिवसेनेला होताना दिसत आहेत. अगदी मविआमधील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढले तरी सर्वाधिक ७७ जागा ह्या शिवसेनेला मिळताना दिसत आहेत. तसेच शिवसेनेला २४ टक्क्यांपर्यंत मते मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता असून, राष्ट्रवादीला ५९ पर्यंत जागा आणि २१.४ टक्के मते मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला फारसा फायदा होताना दिसत नाही. काँग्रेसला ४० जागा आणि १४.२ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

तसेच राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठीही उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे, सुमारे २९.७ टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंना पसंती दिली आहे.  तर देवेंद्र फडणवीस यांना २२.४ टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. तसेच १६ टक्के लोकांनी अजित पवार यांना पसंती दिली आहे.

दरम्यान, या सर्वेनुसार राज्यात आज निवडणूक झाल्यास राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील सत्तेत कायम राहणार आहे. तर भाजपाला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास या तिन्ही पक्षांना मिळून १७८ जागा मिळतील. तर भाजपालाही मतदारांचा चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता असून, भाजपाला १०१ एवढ्या जागा मिळतील. तर इतरांच्या खात्यात ९ जागा जातील.

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास शिवसेनेला ७७, राष्ट्रवादी काँग्रेसला ५९ आणि काँग्रेसला ४० जागा मिळतील. तर सर्व पक्षांची स्वतंत्र निवडणूक लढवल्यानंतरही भाजपाच्या जागा १०४ च्या आसपास राहण्याची शक्यता या सर्वेमधून व्यक्त करण्यात आली आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस