शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांची नार्वेकरांवर बोचरी टीका; भाजपा आमदार सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 19:51 IST

Shiv Sena MLA Disqualification Hearing:  शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

मुंबई: अवघ्या देशाच्या राजकारणाचं लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना असल्याचे निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर बोचरी टीका केली. नार्वेकरांनी दिल्लीतून आलेली स्क्रीप्ट वाचली असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षांनी निकाल जाहीर करताच संजय राऊत यांनी सामना कार्यालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू असून दिल्लीतील ताकद यासाठी दुर्दैवाने मराठी माणसाचाच  वापर करत आहे. एका मराठी माणसानेच शिवसेना संपवण्यात हातभार लावला. शिवसेना संपवण्याचा भाजपाचा कट असून हे त्यांचे जुने स्वप्न होते. जनतेच्या मनामनात असलेली शिवसेना अशी संपणार नाही. आजचा निकाल अंतिम नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयात आवाज उठवूच... पण एकनाथ शिंदेंना जनता कधीच माफ करणार नाही, त्यांनी केलेले पाप कधीच पुसणार नाही, असेही राऊतांनी म्हटले. 

राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल बोलताना राऊतांनी बोचरी टीका केली. ज्यावरून भाजपा आमदार राम कदम यांनी राऊतांविरोधात सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे म्हटले. "राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात आम्ही नक्कीच सर्वोच्च न्यायालयात जाऊ. त्यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला हे स्पष्ट दिसले. त्यांनी नोंदवलेले निरीक्षण हे त्यांचे हे नसून दिल्लीतून आले आहे. याची सर्वांनाच कल्पना आहे, पण शिवसेना संपवण्यासाठी मराठी माणूसच पुढे आला हे दुर्दैव आहे. जनता तुम्हाला माफ करणार नाही", अशा शब्दांत संजय राऊतांनी नार्वेकरांचा समाचार घेतला. 

तसेच विधानसभा अध्यक्षांकडे आज इतिहास लिहण्याची सुवर्णसंधी होती. पण त्यांनी तसे काही न करता महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे पाप केले आहे. त्यांनी जाहीर केलेला निर्णय म्हणजे मॅच फिक्सिंग होती. या निर्णयावरून जे टाळ्या वाजवत आहेत, फटाके फोडण्यात मग्न आहेत, ते सर्व गद्दार आणि बेईमान असून त्यांना जनता धडा शिकवेल, असेही राऊंतानी नमूद केले.

राम कदम आक्रमकसंजय राऊतांनी नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर केल्याचा दाखला देत राम कदम यांनी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे सांगितले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले, "श्रीमान संजय राऊत यांच्यावर विधान सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार... राऊत यांनी  मा. विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर करत स्वतःच्या पराभूत उध्वस्त मानसिकतेचे दर्शन घडविले... हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. पवित्र अशा महान परंपरा असणाऱ्या विधानसभेचा अपमान आहे." 

विधानसभा अध्यक्षांचा मोठा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सर्व १६ आमदारांना पात्र ठरवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या १६ पैकी एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नाही, असे राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचताना स्पष्टपणे सांगितले. विशेष म्हणजे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती देखील विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवली आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Narvekarराहुल नार्वेकरRam Kadamराम कदमBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष