Sunrise Hospital Fire: भाजप मृतांच्या टाळूवरचे लोणी खायलाही विसरत नाहीत; शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 07:11 PM2021-03-26T19:11:58+5:302021-03-26T19:15:29+5:30

Sunrise Hospital Fire: शिवसेनेकडून भाजपवर बोचरी टीका करण्यात आली आहे.

shiv sena leader manisha kayande criticised bjp over bhandup sunrise hospital fire | Sunrise Hospital Fire: भाजप मृतांच्या टाळूवरचे लोणी खायलाही विसरत नाहीत; शिवसेनेची टीका

Sunrise Hospital Fire: भाजप मृतांच्या टाळूवरचे लोणी खायलाही विसरत नाहीत; शिवसेनेची टीका

Next
ठळक मुद्देशिवसेनेची भाजपवर बोचरी टीकाभाजप सत्ता गेल्यामुळे विचलित - शिवसेनातेच प्रशासन आणि तेच पोलीस, तरीही अविश्वास कसा - शिवसेना

मुंबई : भांडुपमधील ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीत हॉस्पिटलही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले आहे. या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही घटनास्थळाला भेट दिली. यावरून आता शिवसेनेकडून बोचरी टीका करण्यात आली असून, भाजप मृतांच्या टाळूवरचे लोणी खायलाही विसरत नाहीत, असा बल्लाबोल करण्यात आला आहे. (shiv sena leader manisha kayande criticised bjp over bhandup sunrise hospital fire)

या संदर्भात आता काही फार बोलणे योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे. मला असे वाटते की, या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर शिवसेनेकडून निशाणा साधण्यात आला आहे. 

आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर या सरकारला जाग येणार: देवेंद्र फडणवीस  

भाजप सत्ता गेल्यामुळे विचलित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील गेले. तिकडे जाऊन राज्यात सुरू असलेले राजकीय विषय हे बोलायचे विसरले नाहीत. भाजप सत्ता गेल्यामुळे इतके विचलित झाला आहेत की, मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला ते विसरत नाहीत, अशी टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केली. 

तेच प्रशासन आणि तेच पोलीस

प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा पूर्वीच्या सरकारमध्ये होती, तीच आताही आहे .सरकार बदलले तरी यंत्रणा तीच राहते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा हे सगळे चांगले होते. आता याच अधिकारी आणि पोलिसांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. सीताराम कुंटे आयएएस अधिकाऱ्यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. अशा अधिकार्‍यांवर ते आता अविश्वास दाखवत आहेत. त्यांची बदनामी करत आहेत, ही बाब अतिशय घृणास्पद आहे, असे मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे. 

‘‘नवनीत राणा यांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’’

दरम्यान, या आगीप्रकरणी सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचं सांगत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. 

Web Title: shiv sena leader manisha kayande criticised bjp over bhandup sunrise hospital fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.