शिवसेना आत-बाहेर!
By Admin | Updated: October 28, 2014 02:38 IST2014-10-28T02:38:29+5:302014-10-28T02:38:29+5:30
शिवसेना बरीच मवाळ झाली असली तरी सेनेला सरकारबाहेर ठेवून छोटे पक्ष व अपक्ष यांच्या सहकार्याने अल्पमतातील सरकार स्थापन करण्याचे भाजपाच्या नेत्यांनी जवळपास निश्चित केल्याचे समजते.

शिवसेना आत-बाहेर!
आज नेता निवड : भाजपाचा अबोला, संघाला हवा सेनेचा सहभाग
नवी दिल्ली/ मुंबई : सरकार स्थापन करण्यासंबंधी गेल्या पाच दिवसांत भाजपाच्या एकाही नेत्याने शिवसेनेसोबत चर्चा केलेली नसल्याने शिवसेना बरीच मवाळ झाली असली तरी सेनेला सरकारबाहेर ठेवून छोटे पक्ष व अपक्ष यांच्या सहकार्याने अल्पमतातील सरकार स्थापन करण्याचे भाजपाच्या नेत्यांनी जवळपास निश्चित केल्याचे समजते. मात्र दिल्लीतील सूत्रंनुसार, अडथळ्यांविना राज्यकारभार करण्याच्या दृष्टीने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेणो हितावह असल्याची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपातीलही काही नेमस्तांनी घेतली आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेना आत की बाहेर याबद्दलचे कुतूहल शिगेला पोहोचले आहे.
सेनेला आताच सत्तेत सहभागी करून घेण्याचा आग्रह धरणा:यांनी तोडग्याचे एक सूत्रही सुचविले आहे. किमान समान कार्यक्रम ठरवून तो शिवसेनेवर बंधनकारक ठरवावा आणि त्यात ‘मराठी माणूस’सारख्या विषयाला स्थान देऊ नये. हा आग्रह धरणारे नेमस्त प्रभावी ठरतात की जहाल गटाचा विजय होणार, हा फैसला मंगळवारी होईल. मंगळवारी दुपारी 4 वाजता विधान भवनात भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होत आहे. त्यात गटनेत्याची निवड केली जाईल. देवेंद्र फडणवीस यांचे नाव यासाठी आघाडीवर आहे. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व पक्षाचे महासचिव जे.पी. नड्डा हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहतील. या वेळी आमदारांना त्यांचे मत मांडण्याची संधी दिली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अपक्षांना एक कॅबिनेट
व दोन राज्यमंत्रिपदे हवीत
अपक्ष आमदारांनी भाजपाकडे एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदांची मागणी केली आहे. नरिमन पॉइंट येथील एका हॉटेलात अपक्ष आमदार व भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांची बैठक झाली. या वेळी एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदे त्याचबरोबर इतरांना महामंडळे देण्याची मागणी भाजपाकडे करण्यात आली असल्याचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी सांगितले. राजनाथ सिंह यांच्यासोबत उद्या बैठक झाल्यानंतर याबाबत निर्णय होईल, असे राणा यांनी सांगितले. या वेळी एकूण सात आमदार उपस्थित होते.
सध्याचे संख्याबळ
भाजपाचे 122 सदस्य आणि छोटे व अपक्ष यामुळे सरकारकडे सध्या 135 ते 138 आमदारांचे संख्याबळ आहे.
बहुमतापेक्षा ही संख्या सात
ते दहाने कमी आहे. मात्र राष्ट्रवादीने विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तटस्थ राहण्याची तयारी दाखवली.
एकदा का सभागृहात बहुमत सिद्ध केल्यावर पुढील सहा महिन्यांत सरकार बहुमतामध्ये आणणो शक्य होईल, असे भाजपा नेत्यांचे मत आहे.
शिवसेनेला सरकारबाहेर ठेवणार!
शिवसेनेला काही मंत्रिपदे दिली तरी मुखपत्रतून वरचेवर सरकारला धारेवर धरून टीका करणो थांबणार नाही. शिवाय उद्धव अथवा आदित्य ठाकरे हे रिमोट कंट्रोलची भूमिका बजावण्याचा मोह सोडणार नाहीत. त्यामुळे शिवसेनेला सत्तेच्या बाहेर ठेवले तर त्या पक्षाचे आमदार घायकुतीला येतील आणि सरकारला शरण येतील. पक्षाचा व्हीप नसेल तेव्हा शिवसेनेचे आमदार बिनबोभाट सरकारला सहकार्य करतील, अशी भाजपा नेत्यांची धारणा आहे.
शिवसेनेबरोबर गेल्या पाच दिवसांत भाजपाच्या एकाही नेत्याने चर्चा केलेली नसल्याने सध्या शिवसेना बरीच मवाळ झाली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रतून महाराष्ट्रात स्थिर सरकारकरिता शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी वरळी परिसरात स्वाभिमान जपण्याकरिता शिवसेनेने सरकारमध्ये सहभागी होऊ नये, असे फलक ठिकठिकाणी लागले आहेत.
राष्ट्रवादी राहणार तटस्थ!
राज्यात स्थिर सरकार स्थापन होण्यास राष्ट्रवादीने भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला आहे. भाजपा सरकारला बहुमत सिद्ध करता यावे म्हणून बहुमतावेळी राष्ट्रवादी तटस्थ भूमिका घेईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. पवारांची ही भूमिका शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी असून, भाजपामधील एका ‘वजनदार’ नेत्याशी सल्ला मसलत करूनच पवारांनी हे पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.
जानकर, मेटेंनाही
हवे मंत्रिपद
राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर व शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आपल्याला विधान परिषदेचे सदस्यत्व देऊन कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद द्यावे, अशी मागणी केली आहे. भाजपाचे तीन सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने या तीन पदांकरिता तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या निवडीमुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एकूण पाच जागांकरिता निवडणूक अपेक्षित आहे.
राष्ट्रवादीचा गट फोडण्याचा पर्याय
राष्ट्रवादीविरोधात भाजपाने आरोप केल्यानंतर आता त्यांचा पाठिंबा घेऊन सरकार कसे स्थापन करणार या नैतिक पेचावर भाजपा नेत्यांनी तोडगा काढला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ अशा काही नेत्यांविरुद्ध भाजपाच्या वतीने सहा याचिका कोर्टात दाखल केल्या आहेत. सध्या या प्रकरणाची सुनावणी ज्या टप्प्यावर आहे तिथून माघार घेणो भाजपाला शक्य नाही. त्यामुळे सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल बोटचेपे धोरण स्वीकारण्याचा प्रश्न नाही. राष्ट्रवादीचे 1क् ते 15 नेते सोडता अन्य आमदारांचा मोठा गट भविष्यात फोडू अथवा फुटू शकतो, असा दावा भाजपाचे नेते करतात.
गृह आणि वित्त मुख्यमंत्र्यांकडेच
भाजपाच्या पहिल्या मंत्रिमंडळात गृह आणि वित्त ही दोन महत्त्वाची खाती मुख्यमंत्र्यांकडेच राहतील. विविध विभागांचे एकत्रीकरण केले जाणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे आणि हरिभाऊ जावळे यांची नावे चर्चेत आहेत.