Subhash Wankhede: मराठवाड्यात शिवसेनेला मोठं बळ, सुभाष वानखेडेंनी काँग्रेसमधून सेनेत केली घरवापसी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 04:38 PM2022-07-20T16:38:22+5:302022-07-20T16:39:15+5:30

Subhash Wankhede: एकीकडे पक्षातून अनेक आजी माजी आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून जात असताना आज शिवसेनेला मराठवाड्यात मोठं बळ मिळालं आहे. हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी काँग्रेसमधून घरवापसी करत पुन्हा हाती शिवबंधन बांधले.

Shiv Sena gains strength in Marathwada, Subhash Wankhede returns home from Congress to Sena | Subhash Wankhede: मराठवाड्यात शिवसेनेला मोठं बळ, सुभाष वानखेडेंनी काँग्रेसमधून सेनेत केली घरवापसी 

Subhash Wankhede: मराठवाड्यात शिवसेनेला मोठं बळ, सुभाष वानखेडेंनी काँग्रेसमधून सेनेत केली घरवापसी 

googlenewsNext

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. जवळपास ४० आमदारांनंतर लोकसभेतील १२ खासदारसुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेगटात दाखल झाले आहेत. दरम्यान, एकीकडे पक्षातून अनेक आजी माजी आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून जात असताना आज शिवसेनेला मराठवाड्यात मोठं बळ मिळालं आहे. हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी काँग्रेसमधून घरवापसी करत पुन्हा हाती शिवबंधन बांधले. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुभाष वानखेडे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे हिंगोलीतील जिल्हाप्रमुख असलेल्या आमदार संतोष बांगर यांनी शिंदेगटात प्रवेश केला होता. तसेच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हेही शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाला खिंडार पडले आहे. अशा परिस्थितीत सुभाष वानखेडे यांच्या रूपात एक बडा आणि अनुभवी नेता पक्षात पुन्हा आल्याने येत्या काही दिवसांत शिवसेनेला अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र वानखेडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. १९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार बनलेल्या सुभाष वानखेडे यांनी तीन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केल्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तत्कालीन मंत्री सूर्यकांता पाटील यांचा पराभव केला होता. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकी मोदी लाटेमध्येही त्यांना विजय मिळवला आला नव्हता. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांनी सुभाष वानखेडे यांचा अवघ्या दीड हजार मतांनी पराभव केला होता.

दरम्यान, राज्यातील आणि जिल्ह्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सुभाष वानखेडे यांनी आज अखेर आपल्या कार्यकर्त्यांसह पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Web Title: Shiv Sena gains strength in Marathwada, Subhash Wankhede returns home from Congress to Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.