शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

शिवसेनेत सध्या ‘रात्रीस खेळ चाले’! केसरकर आणि रामदास कदमांवर जादूटोणा केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 1:53 AM

गृहराज्यमंत्री केसरकर जादूटोणा करतात असा नगराध्यक्षांचा आरोप तर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना तर बंगालीबाबाचे वेड असल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांनी केला.

सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माझ्यावर जादूटोणा करून माझे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता त्यांची काळीजादू चालणार नसून मी गप्प बसणार नाही, असा गंभीर आरोप सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेतकेला. साळगावकर हेही शिवसेनेत असून हा आरोप करत त्यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

साळगावकर म्हणाले, ३५ दिवसांपूर्वी मला भेटण्यासाठी केसरकर हे शिवाजी चौकातील इमारतीमध्ये आले होते. त्या भेटीनंतर मी सतत आजारी पडत आहे. माझे तोंड बंद करण्यासाठी काहीतरी जादूटोणा केला असण्याची शक्यता आहे. केसरकर राजकारणासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. वैचारिक मतभेद असावेत, पण एखाद्याला संपविण्याचा कट असू नये. असा जादूटाणा करून आम्ही गप्प बसणार नाही. आता माझा तोफखाना सुरूच झाला आहे. तो निवडणुकीतही सुरूच राहणार आहे. माझ्याकडे डायरी आहे. त्यात सर्व काही आहे. लवकरच बाहेर काढणार आहे. राणेंचा भाजप प्रवेश रखडायलाही केसरकरांची जादूच कारणीभूत असल्याचा दावाही साळगावकर यांनी केला.पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणजे भगतगिरी आणि जादूटोणावाले असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचेच माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी दापोली येथे एका पत्रकार परिषदेत केला आहे. गेली काही वर्षे दळवी आणि कदम यांच्यातील वाद सातत्याने उघडपणे समोर येत असताना आता दळवी यांच्या आरोपामुळे त्यात भर पडली आहे.

मंत्री कदम हे बंगालीबाबांना सोबत घेऊन फिरतात आणि विशेष म्हणजे कदम यांना विरोधी पक्षनेता बनवण्यासाठीही आमच्यासोबत भगत दिला होता, असा आरोप दळवी यांनी केला आहे. दर अमावस्येला रामदास कदम भगतगिरी करायचे आणि खेड तालुक्यातील जामगे येथील घराच्या गच्चीवर बंगाली बाबांनी दिलेले कोहळे कापायचे, असेही दळवी यांचे म्हणणे आहे. कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करू नये, ज्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला, त्या मतदार संघातून निवडणूक लढवावी. माझ्या मतदार संघात मी आमदार नसलो तरी चालेल, पण या मतदार संघातला आणि पक्षासाठी त्याच योगदान आहे, असा कोणीही उमेदवार चालेल, असेही दळवी यांनी सांगितले.

कदम यांनी आतापर्यंत चारवेळा पक्षाच्या विरोधात काम केले आहे. त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असाही दावा दळवी यांनी केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक वाद उभा राहणार आहे. दापोली विधानसभा मतदार संघातून आता रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRamdas Kadamरामदास कदमDeepak Kesarkarदीपक केसरकर