भाजपाविरोधात शिवसेना करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार
By Admin | Updated: February 10, 2017 20:05 IST2017-02-10T20:05:49+5:302017-02-10T20:05:49+5:30
शिवसेना आणि भाजपा यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपर्यंत येऊन पोहोचला आहे.

भाजपाविरोधात शिवसेना करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - शिवसेना आणि भाजपा यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपर्यंत येऊन पोहोचला आहे. प्रचारसभेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरणाऱ्या भाजपविरोधात शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरु नये, असा निवडणुक आयोगाचा नियम आहे. मात्र भाजपाने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरुन आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून तक्रार केली असून भाजपाविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.