शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
4
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
5
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
6
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
7
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
8
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
9
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
10
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
11
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
12
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
13
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
14
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
15
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
16
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
17
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
18
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
19
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
20
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ

ह्या शिवसेनेचा नेमक्या चल्ला तरी काय? उद्धव ठाकरेंचा नाणारला विरोध; शिवसैनिकांचं मात्र समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 13:13 IST

नाणार प्रकल्पाबद्दल शिवसेनेत संभ्रम; पक्षप्रमुखांचा विरोधी सूर, शिवसैनिकांचा मात्र पाठिंबा

ठळक मुद्देनाणार प्रकल्प सुरू होण्याचा प्रश्नच येत नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेप्रकल्पाच्या समर्थनासाठी शिवसैनिक उतरले रस्त्यावरनाणारमुळे रोजगार येणार, स्थलांतर थांबणार; शिवसैनिकांचा दावा

सिंधुदुर्ग: नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून हा विरोध कायम राहणार असल्याचं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. नाणार प्रकल्प सुरू होण्याचा प्रश्नच येत नसून हा प्रकल्प मी सुरू होऊ देणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यानंतर थोड्याच वेळात सिंधुदुर्गातले शिवसैनिक प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्यानं शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाणारबाबतची भूमिका स्पष्ट केली. नाणार रिफायनरीबाबत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये जाहिरात आली होती. पण जाहिरातदार शिवसेनेचं धोरण ठरवत नाहीत. शिवसेनेचे धोरण आणि भूमिका मी ठरवत असतो, असं ठाकरे म्हणाले. नाणार प्रकल्प बंद आहे. तो सुरू होणार नाही. जाहिरातीमुळे शिवसेनेची भूमिका बदलत नाही. बदलणार नाही. नाणारला विरोध हा कायमच राहणार, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.एका बाजूला उद्धव ठाकरे नाणारला विरोध असल्याचं निक्षून सांगत असताना दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्गातले शिवसैनिक प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. नाणार प्रकल्प स्थानिकांच्या फायद्याचा असल्याचं म्हणत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. प्रकल्प पूर्ण करण्याची हीच ती वेळ असे फलकदेखील शिवसैनिकांच्या हातात होते. 'नाणार प्रकल्पाचे फायदे लक्षात आल्यानं आम्ही त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलो आहोत. या प्रकल्पामुळे दीड लाख रोजगार निर्माण होणार आहेत. मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत. स्थलांतर कमी होणार आहे', असं शिवसैनिकांनी सांगितलं. काही सेवाभावी संस्थांनी स्थानिक शिवसैनिकांची दिशाभूल केली. त्यामुळे आधी आमचा प्रकल्पाला विरोध होता, असंदेखील ते पुढे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाणारला विरोध असल्याचं स्पष्ट केल्यानंतर थोड्याच वेळात शिवसैनिक प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्यानं सिंधुदुर्गात संभ्रमाचं वातावरण आहे. नाणारबद्दल शिवसेनेची नेमकी भूमिका काय, शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंची भूमिका मान्य नाही का, उद्धव ठाकरेंपर्यंत शिवसैनिकांच्या भावना पोहोचत नाहीत का, अशी चर्चा सिंधुदुर्गमध्ये सुरू आहे.आजच्या महत्त्वाच्या बातम्याशिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधानमेट्रो कारशेड आरेमधून रॉयल पार्ममध्ये जाणार? प्रकल्प हलवण्याच्या हालचाली सुरूडोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेशChina Coronavirus : धक्कादायक! चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती?

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्पUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना