शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

खोके सरकार आल्यापासून राज्यात पनवती सुरू, मी मुख्यमंत्री असतो तर...; उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 18:43 IST

मी घरात बसूनही कामे केली, त्याचे कौतुक होतंय. कोरोना, शस्त्रक्रिया यामुळे बंधने होती. तुम्ही कुठे फिरता सुरत, गुवाहटी, गोवा असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई - जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. उद्योगधंदे तिकडे गेले तर राज्यात बेरोजगारी वाढेल, तरुणांना बेकार ठेवायचा. छत्रपतींचा अपमान करून आदर्श मोडायचा. सोलापूर कर्नाटकात गेल्यानंतर माझा पंढरपूरचा विठोबाही कर्नाटकात जाणार. लाखो कोट्यवधी भाविक विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी कर्नाटकात जाणार. महाराष्ट्रातलं दैवत पंढरपूर, अक्कलकोट पळवणार असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना गुवाहाटीला जायची गरज भासली, मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. माझा आत्मविश्वास तुम्ही आहात. मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. मुख्यमंत्री असतो तर तुमच्यावर आत्महत्येची वेळ येऊच दिली नसती. शिवसेना जिवंत सळसळत रक्त. कितीही फोडा तुम्हाला शक्य होणार नाही. डोकं आपटावं लागेल पण माझी शिवसेना तुम्हाला फोडल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका लांबवतायेत. मी तुमच्या भरवशावर उभा आहे. तुमच्या संकटात मी उभा आहे. आत्महत्या अजिबात करायची नाही. आपण शिवरायांचे नाव घेतो मग शिवरायांनी आपल्याला लढायचं शिकवलंय असं त्यांनी म्हटलं. 

तसेच मी घरात बसूनही कामे केली, त्याचे कौतुक होतंय. कोरोना, शस्त्रक्रिया यामुळे बंधने होती. तुम्ही कुठे फिरता सुरत, गुवाहटी, गोवा. पोळ्याला बैलाला सजवलेलं पन्नास खोके. तुम्ही घेतलेले पन्नास खोके शेतकऱ्यांना दिले तर त्यांचे भले होईल. ह्या मिंधे सरकारकडून काही अपेक्षा नाही. नवीन युवक शक्ती येत आहे. आपण हिंदुत्वावरुन कुणाला फसवले नाही. काश्मीरमध्ये भाजपा मेहबूबा सोबत गेले तेव्हा काय होते? मी काँग्रेस राष्ट्रवादीला घेऊन धाराशिव आणि संभाजीनगर करुन दाखवले. आम्ही काही सोडलेले नाही बोक्यांना खोक्यांची भूक म्हणून हे गद्दारी करुन गेले. काय कमी केले होत तुमचं? या गोरगरिबांनी तुम्हाला निवडून गेले. आज तात्पुरता सत्ता पण देशात तुमच्या कपाळावर गद्दाराची ओळख कायमची अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

राज्यपालांचा आगाऊपणा सहन केला नाहीछत्रपतींचा वारंवार अपमान करायचा. गुजरात निवडणुकीसाठी उद्योग तिकडे पाठवताहेत. काल कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातला गावांवर हक्क सांगताहेत. मी मुख्यमंत्री असतांना राज्यपालांचा आगाऊपणा सहन केला नाही. काळ्या टोपीने अनेकदा अपमान केला. अब्दुल गटार, त्याने सुप्रिया सुळेचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो तर कुठल्याही महिलेचा अपमान झाला असता तर लाथ मारून हाकलवून दिला असता. जसा एकाला हाकलला. महिलेचा अपमान झाला हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात जे चाललंय ते पसंत नाही आज आम्ही सरकारमधून बाहेर पडतोय हे जाहीर करा. स्वत:वर विश्वास नाही म्हणून गुवाहाटीला जाता असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा