शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

योग्य वेळ येताच शिवसेना-भाजपा एकत्र, सेनेच्या ज्येष्ठ नेत्याला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 18:26 IST

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आहे.

मुंबई- उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आहे. शिवसेना - राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र येऊन एक वेगळंच सरकार दिलं आहे. पण तिन्ही भिन्न विचारसरणीचे हे पक्ष एकत्र आल्यानं सरकारच्या स्थैर्याबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे या आघाडीत मंत्रिपदावरून अद्याप एकमत झाले नाही. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार केवळ फुटीच्या भीतीने रखडला असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे हे सरकार किती काळ टिकेल याची कोणालाच शाश्वती नाही. शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीसुद्धा या शिवसेना-भाजपा केव्हाही एकत्र येतील, असं भाष्य केलं आहे.आता असं वाटतं छोट्या-मोठ्या गोष्टींवरून आपसात वाद करण्यापेक्षा थोडं सहन करावं, काही गोष्टी असल्यास त्यांनी एकमेकांना आग्रहानं सांगाव्यात, एकत्र काम केल्यास दोघांच्याही फायद्याचं ठरेल, अशी मला खात्री आहे. ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही, त्यावेळी मतं गोळा करण्याच्या निमित्तानं, पक्ष विस्ताराच्या दृष्टीनं अशा गोष्टी घडतात. तसं सध्या शिवसेना आणि भाजपा यांच्याबाबतीत झालं आहे. याचा अर्थ आम्ही भाजपाबरोबर कधीच जाणार नाही, असं नाही. योग्य वेळ येताच माननीय उद्धवजी योग्य भूमिका घेतील, अशी मला खात्री आहे. एकंदरीतच शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्यावर मनोहर जोशींनी सूतोवाच केले आहेत.शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह 15 मंत्रिपदे गेली असून, राष्ट्रवादीला 16 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदं मिळणार असल्याचे सांगण्यात येते. शिवसेनेत मंत्रिपदासाठी जाहीर नाराजी व्यक्त करण्याची संस्कृती नाही. त्यामुळे पक्षप्रमुख सांगतील तोच आदेश समजून नेते काम करतात. मात्र काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये हे पाहायला मिळाले होते. राज्यातही असं होण्याची शक्यता आहे. किंबहुना मंत्रिपद न मिळाल्यास, फुटीची शक्यताही निर्माण होते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी