Shiv sena BJP 21 seats in trouble Vidhan Sabha Election 2019 | बंडखोरांमुळे युतीच्या तब्बल 21 जागा अडचणीत !
बंडखोरांमुळे युतीच्या तब्बल 21 जागा अडचणीत !

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा वारू 120 च्या आत रोखयच तर शिवसेनेला डोईजड होऊ द्यायच नाही, या धोरणानुसार बंडखोरांना युतीत बळ देण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होते. मात्र यामुळे युतीच्या तब्बल 21 जागा धोक्यात असल्याचे चित्र आहे. आपल्या मित्रपक्षाचे अधिक आमदार निवडून येऊ नये यासाठी युतीमध्ये जणू चढाओढ लागली आहे. यामुळे मित्रपक्ष असलेल्या विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेच्या एकमेव जागेलाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात भाजपसाठी पोषक वातावरण असलेल्या  15 मतदार संघात शिवसेनेचे बंडखोर रस्ता आडवू पाहात आहेत. तर शिवसेनेसाठी पोषक असलेल्या पाच मतदार संघात भाजपच्या बंडखोरांनी शड्डू ठोकला आहे. शिवसंग्रामच्या वर्सोव्यातील उमेदवार भारती लव्हेकर यांच्यावर देखील बंडखोरीचे ग्रहण दिसत आहे. त्या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. भारती लव्हेकर यांच्याविरुद्धही शिवसेनेच्या बंडखोर नेत्या राजूल पटेल यांनी मोर्चा उघडला आहे.

अशा प्रकारे मित्रपक्षांसह भाजप आणि शिवसेनेच्या एकूण 21 जागा बंडखोरांमुळे अडचणीत आहेत. कोकणात नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने उमेदवार दिला असून खुद्द उद्धव ठाकरेशिवसेना उमेदवारासाठी सभा घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर राणेंच्या पुत्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीत सभा घेण्याची शक्यता आहे. यावरून उभय पक्ष बंडखोरी रोखण्यासाठी लवकर तोडगा काढतील याची शक्यता धुसर आहे.  

या सर्व घडामोडीमुळे युती असली तरी शिवसेना-भाजपकडून पाडापाडी होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. बंडखोरांसंदर्भात भाजपने पिंपरी चिंचवड, माण, कनकवली, नागपूर दक्षिण या मतदार संघातील बंडखोरांकडे भाजपने लक्ष वेधले. परंतु, त्यावर शिवसेनेकडून काहीही दखल घेतली गेली नाही.

 


Web Title: Shiv sena BJP 21 seats in trouble Vidhan Sabha Election 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.