शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

भाजप-मनसे युतीची शक्यता; शिवसेना नव्या मित्राच्या शोधात, लवकरच मोठी घोषणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 11:03 IST

भाजप-मनसेच्या संभाव्य युतीची धास्ती; शिवसेना नव्या मित्राच्या शोधात

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेऊन आक्रमक हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. राज यांच्या आव्वाजाला भाजपनं भोंगे पुरवून पाठबळ दिलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना सध्या नव्या मित्राच्या शोधात आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. यानंतर भाजपनं अनेकदा शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्याचं भाजप नेते वारंवार म्हणतात. त्यामुळे हिंदुत्ववादी मतं हातून जाण्याची मतं शिवसेनेला आहे. दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत शिवसेनेची स्पेस व्यापण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे शिवसेनेचा मतदार मनसेकडून वळू शकतो. हा घडामोडी लक्षात घेऊन शिवसेना स्थानिक स्वराज संस्थांमध्ये नवा भिडू शोधत आहेत.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चामुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मनं जुळतील का, याची चाचपणी राष्ट्रवादीकडून सुरू आहे.

भाजप-मनसेची युती होणार?मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा हाती घेतला. भूमिपुत्रांच्या रोजगाराचा मुद्दा हाती घेऊन परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मनसैनिकांनी परप्रांतीयांना मारहाणदेखील केली. त्यामुळे भाजपला मनसेसोबत युती करण्यात अडचणी येत होत्या. मात्र आता राज यांनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात थेट भूमिका घेतली आहे. त्याचे परिणाम उत्तर प्रदेशातही पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे लवकरच अयोध्येचा दौराही करणार आहेत. त्यामुळे भाजप-मनसे युती होण्याची शक्यता वाढली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारMNSमनसेBJPभाजपाShiv Senaशिवसेना