Shiv Sena agitation of crop Insurance Company | विमा प्रश्नी शिवसेनेचा मोर्चा फक्त राजकीय स्टंटबाजी: जयाजी सूर्यवंशी
विमा प्रश्नी शिवसेनेचा मोर्चा फक्त राजकीय स्टंटबाजी: जयाजी सूर्यवंशी

मुंबई - विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लुट होत असल्याचे आरोप करत शिवसेनेने १७ तारखेला विमा कंपन्याच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तर हा मोर्चा फक्त शिवसेनेची राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केला आहे. तर विमा मोर्चे काढून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाणी प्रयत्न असल्याचे ही सूर्यवंशी म्हणाले.

येत्या बुधवारी, १७ जुलैला शिवसेनेच्या वतीने पीक विमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा शेतकऱ्यांचा नाही तर शेतक-यांसाठी मोर्चा असेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मात्र शिवसेनेचा हा मोर्चा फक्त दिखावा असल्याचा आरोप होत आहे. शिवसेनेला खरच शेतकऱ्यांची मदत करायची असेल तर, लोकसभेमध्ये मोदी सरकारचा बुरखा फाडावा. कारण पीक विमा योजनेच्या माध्यमातून रिलायन्स आणि अन्य कंपनांच्या मालकांना पोसण्याचे काम दिल्लीवाले करत असून हीच मंडळी पंतप्रधान नरेंद्र  मोदींच्या आजूबाजूला बसत असतात, असा आरोप सूर्यवंशी यांनी केला.

विमा प्रश्नावर मोर्चे कडून काहीच होणार नाही. शिवसेनेला शेतकऱ्यांची चिंता असेल तर त्यांनी, याविषयी लोकसभेत आवाज उठवावा आणि शेतकऱ्यांना विमा मिळवून द्यावा. परंतु मतासाठी विम्याचे राजकरण करून शेतकऱ्यांची फसवणूक करू नये. शेतकऱ्यांची सहनशीलता संपलेली आहे. त्याचा गैरफायदा राजकीय पक्षांनी घेऊ नयेत असेही जयाजी सूर्यवंशी म्हणाले.


 


Web Title: Shiv Sena agitation of crop Insurance Company
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.