शिवसेना सत्तेत राहून मनसेला घाबरते - राज ठाकरे
By Admin | Updated: April 8, 2016 21:16 IST2016-04-08T20:32:14+5:302016-04-08T21:16:34+5:30
शिवसेना सत्तेत राहून मनसेला घाबरत असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना सरकारविरोधात आहे, असं प्रत्येक वेळी म्हणते, मग सत्तेत का असा सवाल करत राज यांनी शिवसेनेला केला.

शिवसेना सत्तेत राहून मनसेला घाबरते - राज ठाकरे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - शिवसेना सत्तेत राहून मनसेला घाबरत असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना सरकारविरोधात आहे, असं प्रत्येक वेळी म्हणते, मग सत्तेत का असा सवाल राज ठाकरे यांनी शिवसेनेला केला. तसेच मनसेची गुढीपाडव्याला सभा जाहीर झाल्यानंतर काहींच्या पोटात दुखायला लागले, असा टोलाही शिवसेनेला लगावला आणि जैतापूर आंदोलनाचं काय झालं?, असा खोचक सवाल करत सत्तेत राहून विरोध करण्याचं शिवसेना नाटक करत असल्याची टीकाही राज ठाकरे यांनी यावेळी केली. हजारो लोक मेले, दंगली झाल्या ज्या मुद्द्यावर भाजप सत्तेत आलं. अमित शाहसुद्धा कोर्टातून सुटले, मग राम मंदिर का सुटत नाही? असं म्हणत करत राज ठाकरेंनी भाजपवर शरसंधान केलं. याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भाची मागणी करणा-या मा. गो. वैद्य आणि श्रीहरी अणे यांनाही लक्ष्य केलं.
राज ठाकरेंच्या भाषणातील काही ठळक मुद्दे : -
- दिग्गजांनी सभा घेऊन शिवाजी पार्क गाजवलं, इथे अटी-शर्ती मग सभा घ्यायच्या कुठे? शाळेच्या जवऴ सभा घ्यायच्या नाहीत.. इथे विरोध, तिथे विरोध मग घ्यायच्या कोठे ?
- शिवसेनेचे झेंडे म्हणजे हा बाळासाहेबांचा मला मिळालेला आशीर्वाद.
- शिवाजी पार्कवर सभा घेण्यास पोलिसांनी, महानगरपालिकेने परवानगी दिली. मात्र काहींच्या पोटात दुखलं
- माध्यमांच्या कार्यालयातच फूट, कोणी सत्ताधाऱ्यांच्या बाजूचं, तर कोणी विरोधात.
- रेल्वेच्या परीक्षा मराठीत झाल्या हे मनसेचं यश.
- मनसेच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील 65 टोलनाके बंद झाले.
- जैतापूर आंदोलनाचं काय झालं? सत्तेत राहून विरोध करण्याचं सेनेचं नाटक
- मनसेमुळे मोबाईलवर मराठी मॅसेज येऊ लागले.
- भारतासारख्या देशाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पाहिजे म्हणून मी पहिल्यांदा बोललो...पण, पंतप्रधान झाल्यानंतर ते बदलले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदीं इतके परदेश दौरे दुसऱ्या कोणत्याही पंतप्रधानाने केले नाहीत.
- प्रगतीच्या बाबतीत आजही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य. गुजरात त्यादिशेने मार्गक्रमण करत आहे.
- देवेंद्र फडणवीस बिनकामाचे, अशा चांगल्या माणसाचा उपयोग नाही
- तुम्हाला विकास जमत नसेल, तर खुर्च्या खाली करा.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 33 हजार विहिरी बांधल्याचं सांगतात, पण कुठे बांधल्या त्या दाखवा.
- संघाची महाराष्ट्र तोडण्याची भूमिका असेल,तर त्यांनी आधी त्यांचा लाडका गुजरात तोडावा.
- छत्रपती शिवरायांचा जन्म जुन्नरचा आणि जिजामातांचा जन्म बुलडाण्याचा, विदर्भ वेगळा करून माय-लेकाची ताटातूट करताय का?
- मंत्र्यांनी त्यांच्या भागाचा विकास केला नाही, म्हणून तुम्ही महाराष्ट्र तोडायला निघालात?
- महाराष्ट्र म्हणजे वाढदिवसाचा केक आहे का तुकडे करायला?
- वेगळया विदर्भाची मागणी करणा-या मा.गो.वैद्य आणि श्रीहरी अणेंवर टिका.
- महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करणे म्हणजे आई आणि मुलाची ताटातूट करणे.
- 3 मुख्यमंत्री विदर्भातून आले,असंख्य केंद्रीय मंत्री झाले,एवढं होऊन जर विदर्भाचा विकास झाला नाही तर त्याला महाराष्ट्राचा काय दोष?
- विदर्भाकडे 15 वर्षं मुख्यमंत्रीपद होते,तरी विदर्भाचा विकास का झाला नाही. हा दोष महाराष्ट्राचा का ?
- मी रिक्षा जाळा म्हटलं की माझ्यावर कारवाई, रामदेव बाबा मुंडकी कापा म्हटले तर ते चालतं?
- ओवेसी इतके बरळतात, मग त्यांच्यावर केसेस का नाहीत? माझ्यावरच का?
- ज्याला आयुष्यात कुठलीच भूमिका घेता आली नाही तो 'अजातशत्रू'.
- अनधिकृत इमारती अधिकृत करता, पण बिल्डरवर कारवाई का नाही?
- भूजला भूकंप झाला त्यावेळी इथल्या गुजरातींनी भरभरून मदत केली, मग लातूरच्या भूकंपावेळी यांचे हात का ढिले झाले नाहीत?
- मुंबईत अमराठी वाढत आहेत.
- अनधिकृत इमारती अधिकृत करता, पण बिल्डरवर कारवाई का नाही?