...तर शिवजयंती 365 दिवस साजरी व्हायला हवी- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 01:22 PM2020-03-12T13:22:31+5:302020-03-12T13:28:54+5:30

आपण वर्षभर हिंदू धर्मामध्ये जे सण साजरे करतो. ते सर्वच्या सर्व सण तिथीनुसार साजरे करतो.

...Shiv Jayanti should be celebrated for 365 days - Raj Thackeray vrd | ...तर शिवजयंती 365 दिवस साजरी व्हायला हवी- राज ठाकरे

...तर शिवजयंती 365 दिवस साजरी व्हायला हवी- राज ठाकरे

googlenewsNext
ठळक मुद्देशिवजयंती हा एक सण आहे, तो तिथीनुसारच साजरा व्हायला हवा. 365 दिवस शिवजयंती साजरी करायला हवी, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.आपण वर्षभर हिंदू धर्मामध्ये जे सण साजरे करतो. ते सर्वच्या सर्व सण तिथीनुसार साजरे करतो.

औरंगाबादः शिवजयंती हा एक सण आहे, तो तिथीनुसारच साजरा व्हायला हवा. 365 दिवस शिवजयंती साजरी करायला हवी, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. ते औरंगाबादेतल्या मनसेच्या कार्यक्रमात बोलत होते. कोरोनाबद्दल सर्वांनी काळजी घेण्याचंही त्यांनी आवाहन केलं आहे. आपण वर्षभर हिंदू धर्मामध्ये जे सण साजरे करतो. ते सर्वच्या सर्व सण तिथीनुसार साजरे करतो.

आपण दिवाळी तारखेनुसार साजरी करत नाही. गणेशोत्सव हा तारखेनुसार साजरा करत नाही. आपला कुठलाच सण तारखेनुसार नसतो. प्रत्येक सण हा तिथीनुसारच साजरा केला जातो. आजचा दिवस महाराजांची जयंती ही कोणा एकाची जयंती नाही. ही महापुरुषाची जयंती आहे आणि तो आपला सण आहे. त्यामुळे तो सणासारखाच साजरा झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा शिवजयंती उत्सव जोरात साजरा होईल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

आधीच देशात इतकी रोगराई, त्यात आणखी वाढ... काय फरक पडतो?; 'कोरोना'वरून राज ठाकरेंची टिप्पणी

या कार्यक्रमात राज ठाकरेंनी कोरोना व्हायरसवर भाष्य केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा शिवजयंती उत्सव जोरात साजरा होईल. कोरोना व्हायरसमुळे कशी काय शिवजयंती साजरी करायची, असं लोकांनी मला सांगितलं. मी म्हटलं, आधीच या देशात इतकी रोगराई आहे, त्यात आणखी एक वाढ, त्याने काय फरक पडतो, तुम्ही काळजी घेतली पाहिजे, याबद्दल काही प्रश्न आणि वाद नाही, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. मनसेनं शिवजयंतीचा सण धूमधडाक्यात साजरा केला असून, औरंगाबादेतल्या मनसेच्या कार्यक्रमाला राज ठाकरेंनीही उपस्थिती दर्शवली आहे. तसेच संध्याकाळी शोभायात्राही काढली जाणार आहे.



आणखी महत्त्वाच्या बातम्या

शिवसेनेत एक वर्षही पूर्ण न झालेल्या नेत्याला राज्यसभेचं 'बक्षीस'; ज्येष्ठांना डावललं

coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये काेराेनाचे तीन रुग्ण ; पालिकेकडून खबरदारीचे उपाय

Breaking : ना खडसे, ना काकडे; राज्यसभेसाठी भाजपाचं तिसरं 'तिकीट' तिसऱ्याच नेत्याला!

'मिनिमम बॅलन्स'बद्दल स्टेट बँकेचा मोठा निर्णय; वाचून होईल 'मॅक्झिमम' आनंद

पुण्यातील 'त्या' ‘कोरोना’ग्रस्ताचा फोटो व्हायरल, फेसबुक युजरविरुद्ध तक्रार

Web Title: ...Shiv Jayanti should be celebrated for 365 days - Raj Thackeray vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.