आधीच देशात इतकी रोगराई, त्यात आणखी वाढ... काय फरक पडतो?; 'कोरोना'वरून राज ठाकरेंची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 12:59 PM2020-03-12T12:59:58+5:302020-03-12T13:04:13+5:30

कोरोना व्हायरसमुळे कशी काय शिवजयंती साजरी करायची, असं लोकांनी मला सांगितलं. मी म्हटलं...

so much disease in the country, even more increase, what does it matter - Raj Thackeray vrd | आधीच देशात इतकी रोगराई, त्यात आणखी वाढ... काय फरक पडतो?; 'कोरोना'वरून राज ठाकरेंची टिप्पणी

आधीच देशात इतकी रोगराई, त्यात आणखी वाढ... काय फरक पडतो?; 'कोरोना'वरून राज ठाकरेंची टिप्पणी

Next
ठळक मुद्देमनसेनं शिवजयंतीचा सण धूमधडाक्यात साजरा केला आहे. औरंगाबादेतल्या मनसेच्या कार्यक्रमाला राज ठाकरेंनीही उपस्थिती दर्शवली आहे. तसेच संध्याकाळी शोभायात्राही काढली जाणार आहे. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी कोरोना व्हायरसवर भाष्य केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा शिवजयंती उत्सव जोरात साजरा होईल. कोरोना व्हायरसमुळे कशी काय शिवजयंती साजरी करायची, असं लोकांनी मला सांगितलं.

औरंगाबाद: मनसेनं शिवजयंतीचा सण धूमधडाक्यात साजरा केला आहे. औरंगाबादेतल्या मनसेच्या कार्यक्रमाला राज ठाकरेंनीही उपस्थिती दर्शवली आहे. तसेच संध्याकाळी शोभायात्राही काढली जाणार आहे. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी कोरोना व्हायरसवर भाष्य केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा शिवजयंती उत्सव जोरात साजरा होईल. कोरोना व्हायरसमुळे कशी काय शिवजयंती साजरी करायची, असं लोकांनी मला सांगितलं. मी म्हटलं, आधीच या देशात इतकी रोगराई आहे, त्यात आणखी एक वाढ, त्याने काय फरक पडतो, तुम्ही काळजी घेतली पाहिजे, याबद्दल काही प्रश्न आणि वाद नाही, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

अशा कुठल्याही गोष्टीची लागण महाराष्ट्रात होता कामा नये. याची लागण काही जणांना झाली आहे, पण तेसुद्धा बरे होतील. स्वतःची तुम्ही काळजी घेणं आवश्यक आहे. हा उत्सव तुम्ही दिमाखात साजरा कराल, संध्याकाळची शोभायात्राही मोठ्या थाटात पार पाडाल, मला याची खात्री आहे. त्याला कोणतंही गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्या, असंही आवाहनही राज ठाकरेंनी मनसैनिकांना केली आहे. तसेच शिवजयंती तिथीनुसार साजरी करायची की तारखेनुसार यासंदर्भातही राज ठाकरेंनी परखडपणे आपलं मत व्यक्त केलं आहे.

शिवजयंती हा एक सण आहे, तो तिथीनुसारच साजरा व्हायला हवा. 365 दिवस शिवजयंती साजरी करायला हवी, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. कोरोनाबद्दल सर्वांनी काळजी घेण्याचंही त्यांनी आवाहन केलं आहे. आपण वर्षभर हिंदू धर्मामध्ये जे सण साजरे करतो. ते सर्वच्या सर्व सण तिथीनुसार साजरे करतो. आपण दिवाळी तारखेनुसार साजरी करत नाही. गणेशोत्सव हा तारखेनुसार साजरा करत नाही. आपला कुठलाच सण तारखेनुसार नसतो. प्रत्येक सण हा तिथीनुसारच साजरा केला जातो. आजचा दिवस महाराजांची जयंती ही कोणा एकाची जयंती नाही. ही महापुरुषाची जयंती आहे आणि तो आपला सण आहे. त्यामुळे तो सणासारखाच साजरा झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा शिवजयंती उत्सव जोरात साजरा होईल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

Web Title: so much disease in the country, even more increase, what does it matter - Raj Thackeray vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.