शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Shankarrao Gadakh : शिंदे की ठाकरे? अखेर शंकरराव गडाख यांनी निर्णय घेतला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 15:30 IST

Shankarrao Gadakh : एकनाथ शिंदेंसोबत जावं की उद्धव ठाकरेंसोबत निष्ठा कायम ठेवावी, या द्विधा मनस्थितीत सापडलेल्या गडाख यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली असून, आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुंबई -  एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला विरोध आणि हिंदुत्वाचं कारण देत पक्षनेतृत्वाविरोधात बंड पुकारले होते. त्या बंडाला शिवसेनेतील ४० आमदारांनी पाठिंबा दिला होता. या ४० आमदारांसोबतच उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद दिलेले काही अपक्ष आमदारही बंडाला पाठिंबा देत एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. दरम्यान, नेवासामधील आमदार शंकरराव गडाख यांनी मात्र उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती. एकनाथ शिंदेंसोबत जावं की उद्धव ठाकरेंसोबत निष्ठा कायम ठेवावी, या द्विधा मनस्थितीत सापडलेल्या गडाख यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली असून, आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना शंकरराव गडाख यांनी सांगितले की, आमदार नाराज होते, ही वस्तुस्थिती आहे. काही राजकीय नाराजी असेल, काही कामाबाबतची नाराजी असेल, उद्धव ठाकरे यांनी त्या त्या वेळी बैठका घेतला, आमच्या माध्यमातून काम करून देण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्या आमदारांनी त्यांचा निर्णय घेतला आहे, मात्र मी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे काय करावं, हा त्या आमदारांचा विषय आहे, असेही गडाख यांनी  सांगितले.

आमदारांमध्ये नाराजी होती याची कल्पना उद्धव ठाकरेंनाही असावी. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात नाराजी आणि त्यातून एवढा मोठा स्फोट होईल, याची कल्पनाही अपेक्षा आम्हाला नव्हती आणि उद्धव ठाकरे यांनाही ती नसावी. शिंदे गटाकडून माझ्याशी सध्यातरी संपर्क झालेला नाही. मात्र मी मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो, असे शंकरराव गडाख यांनी सांगितले.

शंकरराव गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी विजयी झाल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. दरम्यान, शिवसेनेत मोठे बंड झाल्यानंतर  शंकरराव गडाख नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.   

टॅग्स :Shankarrao Gadakhशंकरराव गडाखShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे