शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मुख्यमंत्रिपदावर दावा भक्कम करणारी शिंदे यांची खेळी! इकडे अजित दादा तर तिकडे शरद पवार-शिंदेंच्या भेटीने ठाकरे अस्वस्थ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 08:20 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्ष २००४ मध्ये सर्वाधिक आमदार विजयी होऊनही मुख्यमंत्रिपदावरील दावा शरद पवार यांनी सोडला याबद्दल अजित पवार यांनी यापूर्वी दोनवेळा जाहीर नाराजी प्रकट केली. 

ठाणे : राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपद हा संघर्षाचा मुद्दा ठरणार, याचेच संकेत बुधवारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील ग्रंथाच्या प्रकाशन समारंभच्या सोहळ्यातून मिळाले. राजकारणातील दीर्घ अनुभवी अजित पवार व मुत्सद्दी देवेंद्र फडणवीस या दोन मातब्बर नेत्यांना मागे टाकून मुख्यमंत्रिपद प्राप्त केलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने केलेली खेळी यशस्वी झाल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्ष २००४ मध्ये सर्वाधिक आमदार विजयी होऊनही मुख्यमंत्रिपदावरील दावा शरद पवार यांनी सोडला याबद्दल अजित पवार यांनी यापूर्वी दोनवेळा जाहीर नाराजी प्रकट केली. अजित पवार यांना महायुतीत सोबत घेण्याबाबत रा. स्व. संघ परिवाराने जाहीर नाराजी प्रकट केली आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे निवडणुकीनंतर महायुतीमधील स्थान काय, याबाबत साशंकता आहे. अशा अस्थिर वातावरणात पवार यांनी शिंदे यांच्यापेक्षा आपल्या असलेल्या अनुभवाचा व क्षमतांचा भाजपला अधिक उपयोग होऊ शकतो हेच जाहीरपणे ठसवण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांच्यासोबत असलेले अनेक आमदार, मंत्री हे मूळचे आपले सहकारी असल्याचेही खुबीने सांगण्यास पवार विसरले नाहीत. गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री शिंदे व शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. मराठा आंदोलनाच्या मुद्यावरून शरद पवार यांना मोठेपणा देऊन महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण करण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे. धारावी प्रकल्प अदानी उद्योगाला देण्यास उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांना जोडणारा समान धागा हा अदानी यांच्याशी उभयतांची असलेली जवळीक हाच आहे. शिंदे-पवार भेटीत अदानी कंपनीचे अधिकारी उपस्थित असल्याने ठाकरे अस्वस्थ झाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर धारावीच्या मुद्यावरून महाविकास आघाडीत ठिणगी टाकण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असू शकतो. फडणवीस यांना बाजूला ठेवून शिंदे यांच्या माध्यमातून पवार यांच्याशी संवाद वाढवण्याची ही भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची खेळी शिंदे यांचे महायुतीमधील महत्त्व वाढवणारी आहे. फडणवीस दिल्लीत जाणार अशा वावड्या उठत असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे हे आपला भविष्यातील मुख्यमंत्रिपदाचा दावा भक्कम करू पाहत आहेत, असेच संकेत प्राप्त होत आहेत.

- बुधवारच्या सोहळ्यात आपल्याला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर आपण केवळ आमदारच नव्हे, तर पक्ष सोबत घेऊन आलो असतो, असे सांगत पवार यांनी शिंदेंपेक्षा आपला पर्याय भाजपने निवडायला हवा होता, असे फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे सुनावले. - अर्थात शिंदे यांनी सत्ताधारी बाजू सोडून विरोधकांसोबत येऊन सरकार बनवण्याची जोखीम पत्करली, असे सांगत फडणवीस यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्रिपदाचा पहाटेचा शपथविधी करून पुन्हा शरद पवार यांच्याकडे माघारी गेलेल्या पवार यांना त्यांच्या त्या बेभरोसे कृतीची अप्रत्यक्ष आठवण करून दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण