शहरं
Join us  
Trending Stories
1
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
2
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 05:52 IST

आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण

मुंबई : शिंदेसेनेचे बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये तेथील कर्मचाऱ्याला गावगुंडाप्रमाणे बेदम मारहाण केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विधिमंडळातही पडसाद उमटले. सभापती आणि विधानसभा अध्यक्षांनी याची दखल घ्यावी आणि यावर काय कारवाई करायची त्याचा निर्णय घ्यावा, अशी शिफारस केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

गायकवाड यांनी मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान कॅन्टीनमधून डाळभात, चपाती आपल्या खोलीत मागवले होते; परंतु हे जेवण खराब असल्याचा आरडाओरड करीत पारा चढलेले गायकवाड खोलीतून तसेच बनियन आणि टॉवेलवरच कॅन्टीनमध्ये धडकले आणि त्यांनी जेवण आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याचा जाब विचारत शिवीगाळ करीत मारहाण केली. 

आमदारसाहेब, हे वागणे तुम्हाला शाेभते का?आ. गायकवाड त्यांचा व्हीडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर जनसामान्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सत्तेचा माज कसा असतो, हेच यातून पहायला मिळते, महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार झाल्यासारखे वाटते, असे लोकांनी म्हटले आहे. ⁠आमदार जर खराब जेवणासाठी कॅन्टीनवाल्याला मारहाण करत असेल तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची शिफारससभापती आणि विधानसभा अध्यक्षांनी याची दखल घ्यावी आणि यावर काय कारवाई करायची त्याचा निर्णय घ्यावा, अशी शिफारस याप्रकरणी विधान परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मी समज दिली आहे : एकनाथ शिंदेरागाच्या भरात त्यांनी ते कृत्य केले; पण लोकप्रतिनिधी असताना कायदेशीर कारवाई करण्याचे आपल्याकडे अधिकार आहेत. मी गायकवाड यांना समज दिली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Gaikwadसंजय गायकवाड