शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'शिंदे गट अपात्र होतील, हेच नियमाला धरुन असेल'; भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 14:17 IST

पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार, घटनेनूसार जर अध्यक्षांनी निर्णय दिला, तर १०० टक्के शिंदे गट अपात्र होईल, असं भास्कर जाधव यांनी सांगितले

राज्याच्या राजकारणासाठी आजचा मोठा दिवस ठरणार आहे. काही तासांत गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय खेळाचा निकाल येणार आहे. एकनाथ शिंदे गट की उद्धव ठाकरे गट अपात्र ठरतो त्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. अशातच शिंदे गट अपात्र ठरल्यास पुढे काय? असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. 

पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार, घटनेनूसार जर अध्यक्षांनी निर्णय दिला, तर १०० टक्के शिंदे गट अपात्र होईल, असं भास्कर जाधव यांनी सांगितले. यात काही चुकीचा निर्णय झाला तर देशाच्या लोकशाहीवर परिणाम करणारा निर्णय असू शकेल. देशाची लोकशाही आणि संविधानाचा सन्मान राखायचा असेल सर्वोच्च न्यायालयाचा राखायचा असेल, तर आम्ही अपात्र होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं स्पष्टीकरण भास्कर जाधव यांनी दिलं. शिंदे गटच अपात्र होतील, हेच नियमाला धरुन असेल, असं भास्कर जाधव म्हणाले. रत्नागिरीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

दरम्यान, गेल्या ५ महिन्यांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित प्रकरणातील दोन्ही बाजुंवरील सुनावणी घेतली. आता अखेर आज याबाबत निर्णय येणार आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज दिला जाईल. कायद्याला धरून हा निकाल असेल. कायद्याच्या सर्व तरतुदींचे पालन करून हा निकाल दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत, त्याला अनुसरूनच हा निकाल असेल, असंही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. 

अध्यक्षांनी मेरिटवर निर्णय द्यावा- मुख्यमंत्री

विधानसभा अध्यक्षांचा अधिकृत निर्णय आल्यानंतर मी आपल्यासमोर भाष्य करणार आहे. तोपर्यंत मी एवढंच सांगेन की, शिवसेना पक्ष म्हणून अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाने आम्हाला दिली आहे, तसंच धनुष्यबाण हे चिन्हही निवडणूक आयोगाने आम्हाला दिलं आहे. विधानसभेत आमच्याकडे ६७ टक्के बहुमत आहे आणि लोकसभेत ७५ टक्के बहुमत आमच्याकडे असल्याने निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. पण काही लोकं यामध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप करतात. जे आरोप करतात त्यांचे काही लोक याआधी अध्यक्षांच्या दालनात जेवले आहेत. आम्ही त्यावर आक्षेप घेतला का?" असा खोचक सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. तसंच आमच्याकडे बहुमत असल्याने अध्यक्षांनी मेरिटवर निर्णय द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना शिंदे गटातील कोणत्या १६ आमदारांचा समावेश?

 - एकनाथ शिंदे - भरत गोगावले - संजय शिरसाठ  - लता सोनवणे - प्रकाश सुर्वे - बालाजी किणीकर - बालाजी कल्याणकर - अनिल बाबर  - चिमणराव पाटील - अब्दुल सत्तार - तानाजी सावंत - यामिनी जाधव  - संदीपान भुमरे - संजय रायमूळकर - रमेश बोरनारे - महेश शिंदे

उद्धव ठाकरेंच्या गटातील कोणत्या १४ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

  - अजय चौधरी  - भास्कर जाधव  - रमेश कोरगावंकर  -  प्रकाश फातर्फेकर   - कैलास पाटील  - संजय पोतनीस  - रवींद्र वायकर  - राजन साळवी  - वैभव नाईक  -  नितीन देशमुख  - सुनिल राऊत  - सुनिल प्रभू  - उदयसिंह राजपूत  - राहुल पाटील

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBhaskar Jadhavभास्कर जाधवShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष