शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवार यांचे ‘ते’ विधान धादांत खोटे"; २००४च्या मुद्द्यावरून अजित पवार यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 13:50 IST

भाषणात अजित पवार यांनी शरसंधान साधताना १९९१ पासूनच्या शरद पवार यांच्या राजकारणावर भाष्य केले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात २००४ साली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री केला असता, तर पक्ष फुटला असता हे शरद पवारांनी केलेले विधान धादांत खोटे आहे, असा पलटवार उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत शरद पवार यांनी याबाबत विधान केले होते. अजित पवार गटाची बैठक सोमवारी गरवारे क्लब येथे पार पडली. यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी शरसंधान साधताना १९९१ पासूनच्या शरद पवार यांच्या राजकारणावर भाष्य केले.

ते म्हणाले, २००४ साली आम्हाला वाटत होते, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करावा. मला तेव्हा मुख्यमंत्रीपदात रस नव्हता. तेव्हा भुजबळ मुख्यमंत्री होतील, असे मला वाटत होते. कारण राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा राज्याच्या काेनाकोपऱ्यात पक्ष पोहोचवण्याचे काम भुजबळांनी केले. पद्मसिंह पाटील हेही नवे नव्हते. १९९१ ला शरद पवारांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीत जाण्याची वेळ आली तेव्हा एकत्र काँग्रेस होती. आम्ही सगळ्या आमदारांनी पद्मसिंह पाटील यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी दिले होते. पण शरद पवारांनी सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री केले. नाईक यांनी तेव्हा शरद पवारांचे काहीच ऐकले नाही, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम शरद पवारांनी केला. त्यासाठी आम्हा १७ लोकांना मंत्रिमंडळातून काढले. त्यानंतर १५ वर्षांनी २००४ साली मुख्यमंत्रीपदाचा विषय आला. तेव्हा सगळे नवखे नव्हते. नाईक यांना मुख्यमंत्री केले तेव्हा त्यांनी आपले ऐकले नाही, आता जर कुणाला मुख्यमंत्री केले, तर हे आपल्याला कायमचे दिल्लीला पाठवतील, त्यामुळे कदाचित त्यांनी २००४ साली मुख्यमंत्रीपद घेतले नसेल, असा टोला अजित पवारांनी लगावला.

‘...ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही’

महाविकास आघाडीत एकत्र काम करत होतो, तेव्हा आम्हाला सांगितले जायचे, शिवसेनेविरोधात टोकाची भूमिका घ्या.मी विचारायचो का? तर सांगितले जायचे शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याक समाजाला फार आनंद वाटतो. यावेळी तर अल्पसंख्याक समाज शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता. त्यामुळे कुठे कसे गणित बदलते ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसChief Ministerमुख्यमंत्री