शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 14:02 IST

Sharad Pawar News: गरज संपल्यावर भाजपाची जी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत झाली आहे, तीच भावना राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत असेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभांचा धडाका लावला होता. या सभांमध्ये बोलताना, पंतप्रधान मोदी यांनी ठाकरे गट आणि शरद पवार गटावर जोरदार टीका केली. या टीकेचा शरद पवार यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला असून, पंतप्रधान प्रचंड घाबरले आहेत, या शब्दांत पलटवार केला.

एकवेळ राष्ट्रीय स्वंयसेवकाची गरज होती. पण पक्षाने आपला विस्तार केला. भाजपा स्वत:चा कारभार करण्यासाठी सक्षम आहे, असे विधान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विचाराने स्ट्राँग असणाऱ्या संस्थेबाबत भाजपचे वरिष्ठ नेते जर गरज संपली असे म्हणत असतील तर भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांना धोक्याची घंटा आहे. ज्या दिवशी भाजपाला त्यांची गरज संपेल त्या दिवशी संघाबाबत त्यांनी जो अप्रोच घेतला तसाच अप्रोच राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा शरद पवार यांनी केला. 

पंतप्रधान प्रचंड घाबरले आहेत...

पंतप्रधान प्रचंड घाबरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांनी  सभा घेतल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सभा घेऊन ते सांगत काय आहेत, तर व्यक्तिगत हल्ले करतात. देशासमोरचे महत्वाचे प्रश्न बाजूला ठेवून व्यक्तिगत हल्ले करत आहेत. हे योग्य नाही. मला ते भटकती आत्मा म्हणाले. मुळात त्यांनी राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला पाहिजे. परंतु, त्यांनी लोकांची निराशा करण्याचे काम केले आहे. मला भटकती आत्मा म्हणणे, राहुल गांधींना शहजादा म्हणणे हे काही निवडणुकीचे  प्रश्न नाहीत, असा पलटवार शरद पवार यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.

आमच्यासोबत निष्ठावान कार्यकर्ते

पहिल्यांदा आमच्यासोबत शिवसेना निवडणूक लढत आहे. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना सोडून गेले पण शिवसैनिक जागेवरच आहेत. मोठा कट्टर शिवसैनिकांचा वर्ग आमच्या सोबत जोडला गेला याचा आम्हाला आनंद होता. शिवसेनेसोबतच आम आदमी पक्ष यांचा फायदा झाला. कशाची अपेक्षा न करता ते आम्हाला सहकार्य करत आहेत. त्यांच्याकडे कार्यकर्ते कमी आहेत पण जे आहेत ते खूप निष्ठावान आहेत. शिवसेना आणि आपचे कार्यकर्ते आमच्यासोबत जोडले गेले हा सुखद अनुभव होता, असे शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती