शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बेनामी मालमत्ता प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट; शरद पवार म्हणाले, "निर्णय घेतलेल्यांनी लोकांच्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 18:30 IST

दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाकडून अजित पवारांना मिळालेल्या क्लीन चिटवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar on Ajit pawar Clean Chit : सहाव्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवसांनी अजित पवार यांची जप्त केलेली बेनामी मालमत्ता मुक्त करण्याच आदेश आले आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, दिल्लीच्या आयकर विभाग न्यायाधिकरणाने अजित पवार यांची १,००० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता मुक्त केली आहे. आयकर विभागाने ७ ऑक्टोबर २०२१ रोजी छापा टाकून या मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यात अजित यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांचीही मालमत्ता होती. अजित पवारांना हा मोठा दिलासा मिळाल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

दिल्लीच्या बेनामी न्यायाधिकरण न्यायालयाने ऑक्टोबर २०२१ मध्ये प्राप्तिकर विभागाच्या ताब्यातून अजित पवारांच्या जप्त केलेल्या मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर जप्त केलेली मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून परत करण्यात येणार आहे. या निर्णयावर शरद पवार यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापुरातून बोलत होते. 

अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटबाबत विचारला असता, "मग त्याचं काय? झालं आता. त्यांचा निकाल लागला आहे. त्याच्यावर काय भाष्य करायचं," अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

आधी सिंचन घोटाळा आणि आता जप्त केलेल्या मालमत्ता प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट मिळाली असं पत्रकाराने म्हटलं. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं. आता ते सोडून ज्यांनी निर्णय घेतले त्यांनी एक लोकांच्या समोर स्वच्छ चित्र मांडावे असं शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिलं होतं ही वस्तुस्थिती - शरद पवार  

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी तु्म्हाला फोन केला होता का प्रश्न देखील यावेळी विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी हो असं उत्तर दिलं. "शपथविधीला या म्हणून त्यांचा फोन आला होता. मी त्यांना सांगितले की राज्यसभेचं अधिवेशन चालू आहे. त्यामुळे येणे शक्य नाही. पण त्यांनी निमंत्रण दिलं होतं ही वस्तुस्थिती आहे," असं शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारIncome Taxइन्कम टॅक्स