शरद पवारांनी आयोगाला पक्षाच्या तीन नावांचा प्रस्ताव दिला, पण चिन्हांचा नाही? कारण काय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 17:22 IST2024-02-07T17:12:59+5:302024-02-07T17:22:09+5:30
निवडणूक आयोगाने आज दुपारी ४ वाजेपर्यंत पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यास सांगितले होते.

शरद पवारांनी आयोगाला पक्षाच्या तीन नावांचा प्रस्ताव दिला, पण चिन्हांचा नाही? कारण काय...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांच्या पक्षाचे नाव देण्यास सांगितले होते. याची मुदत आज दुपारी ४ वाजता संपली असून शरद पवार गटाने तीन नावांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिली आहेत. आता यापैकीच एक नाव निवडणूक आयोग ठरविणार आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी आयोगाने शरद पवार यांच्याकडे नावे मागितली होती, अन्यथा अपक्ष ठरविण्यात येणार होते. राष्ट्रवादी अजित पवारांना दिल्याविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. परंतु याचा निकाल लागत नाही तोपर्यंत या गटाला एक नाव घ्यावे लागणार आहे. ही निकाल लोकसभा निवडणुकीत किंवा त्यानंतरही लागू शकतो. आजही उद्धव ठाकरेंना वेगळ्या पक्षाच्या नावाने राजकारणात वावरावे लागत आहे.
दरम्यान शरद पवार गटाने आयोगाकडे त्यांच्या पक्षाची तीन नावे कळविली आहेत. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – एस अशी ही तीन नावे आहेत. तर चिन्हांसाठी शरद पवार वटवृक्ष चिन्हासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.