शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

"एक धगधगता स्वाभिमान..."; बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शरद पवारांचे विशेष ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 09:18 IST

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील मैत्री सर्वश्रुतच होती

Sharad Pawar Balasaheb Thackeray: महाराष्ट्राला राजकारणाची समृद्ध अशी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासाचा जेव्हा उल्लेख केला जातो, तेव्हा त्यात दोन नावे नेहमी घेतली जातात. त्यातील एक नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार आणि दुसरे म्हणजे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. पवार आणि ठाकरे या दोन दिग्गज नेत्यांची घनिष्ठ मैत्री सर्वश्रुत होती. या दोघांनी राजकारणात एकमेकांच्या विरोधात प्रचंड आरोप प्रत्यारोप केले, पण राजकारणाबाहेर वैयक्तिक आयुष्यात ते एकमेकांचा आदर करत असे अनेक किस्से दोघांकडून सांगितले गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी राजकीय संगनमत केले. महाविकास आघाडीने अडीच वर्षे सत्ता राबवली, त्यावेळी उद्धव ठाकरे अनेक विषयांवर शरद पवारांचे मार्गदर्शन घेतले. त्याच दरम्यान आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शरद पवारांनी एक विशेष ट्विट केले.

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक प्रश्नांवर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून भाष्य करणारे एक कुशल व्यंगचित्रकार होते. आपल्या अमोघ वकृत्वाद्वारे मराठी माणसांच्या मनात त्यांनी एक धगधगता स्वाभिमान जागृत केला. मराठी माणसाच्या हितासाठी नेहमीच रोखठोक भूमिका घेणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!", अशा शब्दांत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी आदरांजली वाहिली.

दरम्यान, आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन आहे. संध्याकाळी ६ वाजता उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून आणि ध्वजवंदन करून अधिवेशनाला सुरूवात होईल. संध्याकाळी ६ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे