Sharad Pawar on Karnatak Election: कर्नाटकात भाजप हरणार, बोम्मईंची सत्ता जाणार; शरद पवारांचे कोल्हापुरातून भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 07:27 PM2023-01-28T19:27:30+5:302023-01-28T19:28:03+5:30

लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तशी चर्चा आहे. त्यावर आपले काय मत आहे? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला.

Sharad Pawar on Karnataka Election: BJP will lose in Karnataka, Bommai will go from power; Sharad Pawar's prediction from Kolhapur | Sharad Pawar on Karnatak Election: कर्नाटकात भाजप हरणार, बोम्मईंची सत्ता जाणार; शरद पवारांचे कोल्हापुरातून भाकीत

Sharad Pawar on Karnatak Election: कर्नाटकात भाजप हरणार, बोम्मईंची सत्ता जाणार; शरद पवारांचे कोल्हापुरातून भाकीत

Next

काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार फोडून सत्ता स्थापन केलेल्या कर्नाटकमध्ये बोम्मईंचे सरकार पुढील निवडणुकीत पराभूत होणार असल्याचे भाकीत शरद पवार यांनी कोल्हापुरात केले आहे. 

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तशी चर्चा आहे. त्यावर आपले काय मत आहे? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर, लोकसभा आणि विधानसभा एकत्र होतील असे काही लोकांचे मत आहे. पण त्याची विश्वासार्ह माहिती माझ्याकडे नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच काही सर्व्हेंच्या जनमत चाचणीवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. 

याचबरोबर कर्नाटकच्या आगामी निवडणुकीवर पवारांनी भाष्य केले. "आगामी राज्यांच्या निवडणुकांत कर्नाटकात भाजपची सत्ता येणार नाही, असे स्पष्ट संकेत आहेत. आम्ही विरोधी पक्षांना एकत्र करून एकसंघ आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न करत आहोत. परंतु सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे स्थानिक प्रश्न आहेत ज्यांना सामोरे जाणे आवश्यक आहे.'', असे पवार म्हणाले. 

बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांच्यासोबत राहणार नाही, असे चित्र या सर्व्हेतून दिसत आहे. तो सर्वे मी वाचला. आता जे सत्ताधारी आहेत, त्यांच्याविरोधात देशात जनमत आहे. महाराष्ट्रातील आकडेवारी पाहता सत्ताधारी पक्षाच्या हातात सत्ता राहील असे वाटत नाही. यापूर्वीचे सर्व्हे पाहिले. पाच ते दहा वर्षापूर्वीचे याच एजन्सीने केलेले सर्व्हेही पाहिले तर या एजन्सीचे आकडे खरे ठरले आहेत. या एजन्सीने एकप्रकारे ही दिशा दाखवली आहे. ही दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीचे आहे असे वाटत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

तसेच या सर्व्हेतून देशात काँग्रेसचे आकडे वाढतील असे स्पष्ट दिसत आहे. कर्नाटकात भाजपचे राज्य राहणार नाही. तिथे परिवर्तन करण्यास लोक उत्सुक आहेत. असे चित्र सर्वत्र दिसत आहे. पण उत्तर प्रदेश हे मोठे राज्य आहे. त्याची आकडेवारी आलेली नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

Web Title: Sharad Pawar on Karnataka Election: BJP will lose in Karnataka, Bommai will go from power; Sharad Pawar's prediction from Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.