शरद पवार-राहुल गांधींची फोनवरून चर्चा, आता लवकरच...; जयंत पाटलांची महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 06:23 PM2024-02-22T18:23:17+5:302024-02-22T18:23:55+5:30

लोकसभा निवडणुकी संदर्भात शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात झाली चर्चा

Sharad Pawar meets Rahul Gandhi over Lok Sabha Elections 2024 Jayant Patil gives important information | शरद पवार-राहुल गांधींची फोनवरून चर्चा, आता लवकरच...; जयंत पाटलांची महत्त्वाची माहिती

शरद पवार-राहुल गांधींची फोनवरून चर्चा, आता लवकरच...; जयंत पाटलांची महत्त्वाची माहिती

Sharad Pawar Rahul Gandhi, Jayant Patil Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातल्या संघटनेबाबत चर्चा केली. लोकसभेच्या जागावाटपाच्या वृतांबाबत चर्चा झाली. राज्यात किती जागा जिंकू शकतो याची माहिती त्यांना दिली असे जयंत पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकांच्या बाबतीतला महाराष्ट्रातील पेच लवकरात लवकर सोडवला जाईल. त्यासंदर्भात पवार व राहुल गांधी यांची फोनवरून चर्चा झाली आहे, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात सापडत असलेल्या ड्रग्जवर बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ड्रग्सच्या घटना घडल्या. त्यावेळी सरकारला जबाबदार ठरवण्यात आले. पुण्यात ज्यावेळी छापेमारीत ड्रग्सचे साठे सापडले आहेत त्यावेळी वर्णन काय तर पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणाने ड्रग्स पकडले. यावेळी सरकारची जबाबदारी नाही? आज महाराष्ट्रात ड्रग्सचा सूळसुळाट आहे व कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती मोठ्या प्रमाणात हाताबाहेर गेलेली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनावर ते म्हणाले की, परीक्षेच्या दिवसांत विद्यार्थ्यांना परीक्षा स्थळापर्यंत पोहोचण्यास अडथळा येऊ नये यासाठी मनोज जरांगे यांना विनंती राहील की अशा प्रकारचे आंदोलन करताना काळजी घ्यावी. मनोज जरांगे यांच्याशी कधीही आदरणीय शरद पवार साहेबांचा संपर्क आलेला नाही, त्यांचा संपर्क कोणाशी आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असावे असा माझा अंदाज आहे. मुख्यमंत्री व मनोज जरांगे पाटील यांच्या संवादात कशामुळे विसंवाद तयार होतोय? याचा अभ्यास करून सरकारने अशी आंदोलने वारंवार होणार नाहीत याची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे अशी सूचना त्यांनी केली.

मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर होणाऱ्या वारेमाप खर्चावर बोलताना ते म्हणाले की, सरकारला उत्पन्न मिळवण्याचे गांभीर्य नाही पण खर्च करण्यात स्पर्धा चालू आहे. कोणत्या मंत्र्याने काय करावं याच्यावर कोणाचेही नैतिक बंधन किंवा अंकुश राहिलेले नाही. त्यामुळे बंगल्यांवर फार मोठ्या प्रमाणात खर्च चालू आहेत, त्याचा हिशोब राज्याचे अर्थमंत्री देतील अशी आमची अपेक्षा आहे असा टोला त्यांनी लगावला.

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना जयंत पाटील यांनी सरकारला टोला लगावला. ते म्हणाले की, सत्यपाल मलिक स्पष्टपणाने बोलले याची त्यांना शिक्षा मिळत आहे का? हे तपासावे लागेल.

Web Title: Sharad Pawar meets Rahul Gandhi over Lok Sabha Elections 2024 Jayant Patil gives important information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.