Sharad Pawar has the contract to run the government: Chandrakant Patil | सरकार चालविण्याचे कंत्राट शरद पवारांच्याकडे, उद्धव नामधारी : चंद्रकांत पाटील

सरकार चालविण्याचे कंत्राट शरद पवारांच्याकडे, उद्धव नामधारी : चंद्रकांत पाटील

ठळक मुद्देसरकार चालविण्याचे कंत्राट शरद पवारांच्याकडे : चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगाविला टोला

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही. व्हिडीओ कॉन्फरर्सद्वारे चर्चा करीत नाहीत. ते काय प्रश्न सोडविणार? त्यांना भेटून काय उपयोग? त्यांनी सरकार चालविण्याचे कंत्राट त्यांनी शरद पवार यांच्याकडे दिले आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना गुरुवारी सांगलीत लगाविला.

महापालिकेच्या विविध विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त प्रदेशाध्यक्ष पाटील सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन काही प्रश्न मांडले. त्यावर राज्यपालांनी राज ठाकरे यांना शरद पवार यांची भेट घ्या, असा सल्ला दिला. त्यासंदर्भात विचारता चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर टोलेबाजी केली.

ते म्हणाले, शरद पवार हेच राज्य चालववितात, मग उद्धव ठाकरे यांना भेटून काय उपयोग? ते घराबाहेर पडत नाहीत. आठ महिने झाले, त्यांनी माझ्या पत्राचे साधे उत्तरही दिले नाही. राज्यात देवेंद्र फडणवीस व शरद पवार हेच जनतेला सहज भेटतात. त्यामुळे राज्यपालांनी शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला असावा, असा चिमटा काढला.

आपला पक्ष वाढविण्यासाठी सारेच प्रयत्न करतात. त्यात वावगे काहीच नाही. काहीजण केवळ बोलतात पण आम्ही कृतीत आणतो. उद्धव ठाकरे यांनी भगवा नाही तर तिरंगा म्हटले पाहिजे, असा टोला लगाविला. कांद्याबाबत व्यापार्‍यांनी सरकारला वेठीस धरले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना पत्र लिहिल्याचेही त्यांनी सांगितले.

ही तर महाराष्ट्राची संस्कृती

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांचे कौतुक केले होते. त्याबाबत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री घर सोडण्यास तयार नसताना शरद पवार या वयातही राज्यभर फिरत आहेत. त्याचे कौतुक केले तर काय झाले? पक्ष कोणताही असो, काम करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक झालेच पाहिजे. हीच महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sharad Pawar has the contract to run the government: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.