शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तुम्ही सरकारमध्ये जा; मी अध्यक्षपद सोडतो, असे शरद पवार म्हणाले होते, अजित पवारांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 07:48 IST

Ajit Pawar: भाजपसोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती शरद पवार यांना दिली होती. शरद पवारांनी मला बोलावून सांगितले की, आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला.

मुंबई - भाजपसोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती शरद पवार यांना दिली होती. शरद पवारांनी मला बोलावून सांगितले की, आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दोन दिवसीय चिंतन शिबिराचा समारोप करताना पवार यांनी राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि सत्ता स्थापनेनंतरचा घटनाक्रम प्रथमच सविस्तरपणे उलगडला.आम्ही २ जुलैला घेतलेला निर्णय आवडला नव्हता, तर १५ दिवसांनी १७ जुलैला आम्हा सगळ्या मंत्र्यांना त्यांनी चव्हाण प्रतिष्ठानला कशाला बोलवले? तुम्ही आम्हाला गाफील ठेवायचे का? अशी उद्विग्नता अजित पवार यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, सर्व ठीक आहे! - प्रफुल्ल पटेल, मी, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असे आम्ही १० ते १२ जण ‘देवगिरी’वर बैठकीसाठी बसलो. - सरकारमध्ये जाण्याबाबत शरद पवारांना थेट सांगण्याआधी सुप्रियाला सांगितले. तेव्हा तिने  सांगितले की, ‘मला सात ते दहा दिवस द्या. मी साहेबांना राजी करते.’ आम्ही १० दिवस थांबलो. - तेव्हा जयंत पाटील, अनिल देशमुखही तिथे होते. त्यानंतर आम्ही थेट शरद पवारांकडे गेलो. त्यांनी सर्व ऐकले. ते म्हणाले, ‘ठीक आहे!’ असा दावा अजित पवारांनी केला.

उद्योगपतीकडे का बोलावले? १२ ऑगस्टला पुण्यातील एका उद्योगपतीकडे बोलवले. त्यांनी सांगितले इथे वरिष्ठ (शरद पवार), जयंत पाटील, तुम्ही आणि मी एकत्र जेवायचे. निरोप आल्यानंतर मी गेलो. पूर्ववत एकत्र येण्याचा निर्णय झाला. दीड महिना उलटला तरी निर्णय झाला नाही. जर निर्णय घ्यायचाच नव्हता तर कशासाठी हे सगळे केले. कुणासाठी केले, असा सवाल त्यांनी केला. 

धरसोड वृत्ती, गाफील ठेवणे बरोबर नाही!पुस्तक प्रकाशनानंतर शरद पवार यांनी राजीनामा दिला. पण, त्यानंतर आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी बोलवून घेतले आणि त्यांना सांगितले, “उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक, महिला व युवक पाहिजेत. त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की राजीनामा परत घ्या.” तेव्हा मला प्रश्न पडला की, राजीनामा द्यायचा नव्हता तर दिलाच का? त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. आम्हाला सांगितले की, माझ्यानंतर सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. सगळ्या गोष्टी ठरल्या. सगळ्यांनी तयारी दाखवली. ही धरसोड वृत्ती, गाफील ठेवणे बरोबर नाही. हे मला पटत नाही. तुम्ही एकदा काय ते ठरवा, हेही मी त्यांना सांगितल्याचे अजित पवार म्हणाले. 

...तर उपमुख्यमंत्रिपद चारदा मिळाले नसते : जितेंद्र आव्हाड- तुम्ही पवार नसता, तर बारामतीतून निवडून आला असता का? अहो, तुमची पुण्याई की तुम्ही त्यांच्याच घरात जन्माला आलात. आव्हाडांच्या घरात जन्माला आला असता तर तुम्हाला चार वेळा उपमुख्यमंत्रिपद मिळाले नसते.- बंडखोरी केल्यानंतरही तुम्हाला पक्षात घेतले नसते. शरद पवारांचा पुरोगामीत्वाचा चेहरा पुसून टाकायचा, त्यांचा राजकीय प्रवास धुळीला मिळवायचा, पण आपण सत्तेत राहायचे हे आम्हाला नामंजूर होते, असा गौप्यस्फोट करत शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड