शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांमुळेच मला राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद मिळालं- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 01:08 IST

अॅड. उज्ज्वल निकम यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद ताईंमुळे मिळालं की दादांमुळे असा प्रश्न विचारण्यात आला होता.

नागपूर- लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यातील लोकमत की अदालतमध्ये मान्यवरांना सामान्यांच्या मनातील प्रश्न विचारण्यात आले आहेत. अॅड. उज्ज्वल निकम यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद ताईंमुळे मिळालं की दादांमुळे, असा प्रश्न विचारला. त्याला जयंत पाटलांनीही आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.दादा किंवा ताईंमुळे नव्हे, तर शरद पवारांमुळे मला राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी आणि मान्यवर उपस्थित आहेत. सरपंच पदापासून संसदेपर्यंत उत्तम कामगिरी करणा-या लोकप्रतिनिधींचा गौरव करण्याची प्रथा ‘लोकमत’ने सुरू केली आहे. या मालिकेतील विधिमंडळ पुरस्काराचे हे दुसरे पुष्प आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त आमदारांचा सन्मान केला जाणार आहे.सोहळ्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गौरवास्पद कामगिरी करणारे विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख आणि विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.

टॅग्स :Lokmat Vidhi Mandal Purskarलोकमत विधिमंडळ पुरस्कारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलUjjwal Nikamउज्ज्वल निकमSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस