राज्यातील सत्तास्थापनेनंतर भाजप नेत्यांनी भीतभीत केले आपले अभिनंदन : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 10:57 IST2019-12-19T10:56:21+5:302019-12-19T10:57:15+5:30

शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या राज्यातील पुढील कामकाजाविषयी यावेळी सांगितले. महाविकास आघाडी स्थानिक पातळीपर्यंत पोहचत आहे. महाविकास आघाडीतून स्थानिक पद देण्याच्या सुचना आपण आमदारांना केल्याचे त्यांनी सांगितले. 

Sharad Pawar congratulates BJP leaders after state rule | राज्यातील सत्तास्थापनेनंतर भाजप नेत्यांनी भीतभीत केले आपले अभिनंदन : शरद पवार

राज्यातील सत्तास्थापनेनंतर भाजप नेत्यांनी भीतभीत केले आपले अभिनंदन : शरद पवार

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन विदर्भात विस्तारण्यासाठी आणि अधिवेशनावर लक्ष ठेवण्यासाठी नागपुरात दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर झालेल्या घडामोडींवर प्रकाश टाकला. तसेच भाजपच्या नेत्यांनी भीतभीत का होईना राज्यात सत्तांतर केल्याबद्दल आपले अभिनंदन केल्याचे त्यांनी म्हटले. 

राज्यातील सत्तास्थापनेनंतर दिल्लीला दाखल झालो असताना भाजपचे खासदार चोरून माझे अभिनंदन करत होते! महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर इतर पक्षांचे खासदार, नेते संसद भवनात जाहीरपणे माझे अभिनंदन करत होते. मात्र, भाजपचे खासदार, मंत्री जेव्हा भेटायचे, तेव्हा ते आधी आजूबाजूला बघायचे, कोणी पाहात तर नाही ना, याची खात्री करायचे आणि मग माझा हातात हात घेऊन अभिनंदन करायचे, असं शरद पवार यांनी मिश्कीलपणे सांगितले. 

शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या राज्यातील पुढील कामकाजाविषयी यावेळी सांगितले. महाविकास आघाडी स्थानिक पातळीपर्यंत पोहचत आहे. महाविकास आघाडीतून स्थानिक पद देण्याच्या सुचना आपण आमदारांना केल्याचे त्यांनी सांगितले. 
 
Web Title: Sharad Pawar congratulates BJP leaders after state rule