शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 18:07 IST

शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे.

Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार विरुद्ध पवार संघर्षामुळे यंदाची लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली. बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांच्या भावजय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिल्याने पवार कुटुंबात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद आणखी तीव्र झाल्याची चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे.

"राजकारणापलीकडे भविष्यात अजित पवारांनी मदतीसाठी हात पुढे केला तर तुम्ही त्यांना तो हात द्याल का?" असा प्रश्न 'बीबीसी मराठी'च्या मुलाखतीत शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर पवार यांनी म्हटलं की, "असा प्रश्न येणारच नाही. कारण अजितचा स्वभाव मला माहीत आहे. तो कधी कोणासमोर हात पसरणार नाही."

"व्यक्तिगत संबंधांमध्ये कटुता येणार नाही" 

पवार कुटुंबात झालेल्या राजकीय संघर्षावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, "हे घडलं नसतं तर मला आनंदच झाला असता. पण बारामतीची निवडणूक ज्यांनी पवार विरुद्ध पवार केली ती व्यक्ती यापूर्वी कधी राजकारणात किंवा समाजकारणात नव्हती. याउलट माझी मुलगी तीन वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी झाली आहे. त्यापूर्वी राज्यसभेतही गेली होती आणि ती राजकारणात पूर्णवेळ काम करत आहे. त्यामुळे मतभिन्नता झाली नसती तर चांगलं झालं असतं. पण लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. उद्या एखाद्या वाटलं की ही भूमिका योग्य नाही, ती भूमिका योग्य आहे, तर ते त्यांच्या रस्त्याने जाऊ शकतात. मात्र त्यामुळे व्यक्तिगत संबंधांमध्ये कटुता येण्याचं कारण नाही," अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.

"विधानसभा निवडणूक वस्तुस्थिती स्पष्ट होईल" 

शरद पवार यांनी या मुलाखतीदरम्यान त्यांच्यापासून दूर गेलेल्या पक्षाच्या सहकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. "भाजपला हे हवंच होतं. याबाबत सर्वजण सांगतच होते. पण हा प्रश्न फक्त माझ्या कुटुंबाबाबत मर्यादित नाही. आम्ही सर्वांनी मिळून हा पक्ष उभा केला आणि राज्यात एक शक्तीकेंद्र तयार केलं. आमचे सगळे लोक १९९९ पासून अनेक वर्षे सत्तेत होते. त्यातून काही लोकांना मंत्रीपदं मिळालं, काहींना तर तीन-तीन वेळा उपमुख्यमंत्रिपद मिळालं. मात्र त्यांनी आता वेगळी भूमिका घेतली आणि रस्ते वेगळे झाले. आता बघूयात पुढे काय होतं. खरी निवडणूक भविष्यात विधानसभेची आहे. विधानसभा निवडणुकीत वस्तुस्थिती स्पष्ट होईल, आज त्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी