शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार, पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह सांत्वनासाठी पोहचले; ‘साहेबां’ना पाहताच सुनेत्रा पवार यांचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 22:58 IST

ज्येष्ठ नेते शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह बुधवारी सायंकाळी बारामतीमधील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याकरीता पोहोचले होते.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह बुधवारी सायंकाळी बारामतीमधील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याकरीता पोहोचले होते. यावेळी निवासस्थानी पोहचल्यावर शरद पवार यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करीत हात जोडले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे डोळे पाणावले,यावेळी हा भावनिक क्षण अनुभवताना उपस्थितांना गहिवरुन आल्याने वातावरण भावनिक झाल्याचे चित्र होते.

सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना पहिल्यांदाच भेटत सांत्वन केले. आज पहिल्यांदाच शरद पवार आणि सुनेत्रा पवार आमने-सामने आले होते. बुधवारी संपुर्ण पवार कुटुंबिय सहयोग निवासस्थानी उपस्थित होते. यावेळी पार्थ पवार, जय पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, रणजित पवार, विजया पाटील, निता पाटील, आणि आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार देखील सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते पवार यांना आतमध्ये आणण्यासाठी पार्थ पवार प्रवेशद्वारापर्यंत गेले होते.

थरथरत्या पावलांनी पोहचलेल्या पवार यांनी थरथरत्या हातांनीच अजित पवार यांना हात जोडले. यावेळी उपस्थितांना गहिवर अनावर झाला. त्यानंतर ज्येष्ठ नेते पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह उपस्थित अन्य पवार कुटुंबियांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट घेत त्यांच्या सहवेदना स्वीकारल्या. पवार कुटुंबाने नेहमीच कुटुंबापासून राजकारण दुर ठेवले. आज देखील अजित पवार यांच्या अकाली एक्झिटनंतरच्या या कठीण काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यावरुन राज्यात राजकीय वातावरण तापलेले असतानाच पवार कुटुंबाचा एकोपा बारामतीकरांनी पुन्हा एकदा अनुभवला. तसेच आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पवार कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले.

दरम्यान, आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी असलेल्या आधारतीर्थ आश्रमातील काही निराधार अनाथ चिमुकल्यांनी उपस्थित राहत अजित पवार यांना श्रध्दांजली अर्पण केली. या चिमुकल्यांनी निरागस भावनेने यावेळी अजितदादांच्या प्रतिमेच हात जोडत श्रद्धांजली अर्पण केली. चिमुकल्यांच्या हृदयस्पर्शी श्रद्धांजलीने अजित पवार यांना निराधारांविषयी असलेला जिव्हाळा अधोरेखित झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar consoles Sunetra Pawar after Ajit Pawar's passing in Baramati.

Web Summary : Sharad Pawar, with his wife, visited Sunetra Pawar in Baramati to offer condolences after Ajit Pawar's death. Sunetra was emotional. The Pawar family gathered, showcasing unity during this difficult time. Even children from an orphanage paid tribute, highlighting Ajit Pawar's compassion.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारBaramatiबारामती