लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांसोबत ‘शांताबाई’ फेम संजय लोंढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 10:21 AM2021-09-14T10:21:22+5:302021-09-14T10:23:49+5:30

अभिनेता अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आले.

'Shantabai' fame Sanjay Londhe to join NCP with Lavani queen Surekha Punekar | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांसोबत ‘शांताबाई’ फेम संजय लोंढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांसोबत ‘शांताबाई’ फेम संजय लोंढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

googlenewsNext
ठळक मुद्देगायिका वैशाली माडे, कलाकार मेघा घाडगे, सविता मालपेकर अशा अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे.अवघ्या महाराष्ट्रानं शांताबाई या गाण्याला डोक्यावर घेतलं. येत्या १६ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कलाकारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे

पुणे – लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरसोबत लोकगायक ‘शांताबाई’ फेम संजय लोंढेही(Sanjay Londhe) येत्या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात हा प्रवेश सोहळा रंगणार आहे. मागील काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कलाकारांचा ओघ वाढतच चालला आहे.

अभिनेता अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. गायिका वैशाली माडे, कलाकार मेघा घाडगे, सविता मालपेकर अशा अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. आता शांताबाई फेम संजय लोंढे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यासह १२ कलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार(NCP Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनात कलाकारांसाठी भरीव काम करायचं आहे अशी इच्छा असल्याचं गायक संजय लोंढे यांनी सांगितलं. अवघ्या महाराष्ट्रानं शांताबाई या गाण्याला डोक्यावर घेतलं. प्रत्येक कार्यक्रमात डिजेच्या तालावर शांताबाई गाण्यावर तरुणाई थिरकल्याचं पाहायला मिळालं. शांताबाई या लोकगीतानं संजय लोंढे प्रसिद्धी झोतात आले. तुफान लोकप्रिय झालेल्या या गाण्याने तरुणाईला वेड लावलं होतं.

येत्या १६ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कलाकारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. यात लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि संजय लोंढे यांच्यासह १२ कलाकार प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर राजकीय मैदानात उतरणार असल्याचं नेहमी बोललं जायचं. मागील वेळी पुणेकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं बोललं होतं. तेव्हापासून सुरेखा पुणेकर राजकीय पक्षात प्रवेश करणार हे निश्चित होतं. राज्यपालांकडे पाठवलेल्या नावांपैकी एका नावावर आक्षेप असल्यास सुरेखा पुणेकर यांना संधी मिळू शकते अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आतापर्यंत कलेची सेवा केली आणि जनसेवा करण्यासाठी राजकारणात यायचंय. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या. लोकगायक आनंद शिंदे यांचं नावही राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एका जागी पाठवण्यात आलं आहे. साहित्य आणि कला क्षेत्रातून आनंद शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकी मिळणार आहे.

Web Title: 'Shantabai' fame Sanjay Londhe to join NCP with Lavani queen Surekha Punekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.