शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा

By दीपक भातुसे | Updated: June 27, 2025 06:09 IST

Nagpur to Goa Shaktipeeth Expressway Latest News: राज्य मंत्रिमंडळाने या महामार्गासाठी २० हजार ७८७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

- दीपक भातुसे, मुंबई राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाचा भूसंपादन खर्च, वाढीव व्याजदर आणि अंमलबजावणीवर वित्त विभागाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या महामार्गामुळे राज्यावर आर्थिक संकट ओढवेल, असा एकप्रकारे इशाराच वित्त विभागाने दिला आहे.

राज्य मंत्रिमंडळाने या महामार्गासाठी २० हजार ७८७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, या तरतुदीसह इतर बाबींवर वित्त विभागाने आपल्या अभिप्रायात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

विशेषतः राज्यावरील वाढणारे कर्ज आणि शक्तीपीठ महामार्गासाठी महागड्या व्याजदराने उभारण्यात येणारे कर्ज याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

वित्त विभागाने काय म्हटलंय...

एमएसआरडीसीने महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी १२ हजार कोटी आणि त्यावरील संभाव्य व्याजासाठी ८,७८७ कोटी रकमेस प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला. त्याऐवजी बांधकाम खर्चासह संपूर्ण रकमेचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणायला हवा होता.

या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी १७ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना १२ हजार कोटी इतक्या निधीची मागणी करण्याची कारणे एमएसआरडीसीने सादर केलेली नाहीत.

राज्य सरकार शक्तीपीठ महामार्गासाठी हुडकोकडून जे कर्ज घेणार आहे त्याचा व्याजदर ८.८५ टक्क्यांपेक्षा कमी नसेल. 

राज्य सरकारने खुल्या बाजारातून कर्जरोख्याद्वारे उभारलेल्या रकमेचा व्याजदर ६.७५ टक्के इतका आहे. म्हणजेच हुडकोकडून २.१ टक्के जास्त व्याजदराने हे कर्ज घेतले जात असून एवढ्या व्याजदराने कर्जाची परतफेड करणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही.

प्रकल्पाच्या अचूक संरेखनासाठी भूसंपादन हाती घेण्यापूर्वी पर्यावरण मान्यता घेणे आवश्यक आहे.

राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता

मोठ्या प्रकल्पांसाठी कर्ज उभारणीमुळे राज्याचा भांडवली खर्च १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढेल, राजकोषीय तूट मर्यादेपेक्षा ३ टक्के जास्त म्हणजे ३.१३ ते ४.०८ टक्के पर्यंत असेल.

तसेच येत्या ४-५ वर्षात राज्य सकल उत्पन्नावर कर्ज २५ टक्क्यांपर्यंत पोहचेल. त्यामुळे व्याज देयकांमध्ये १४ टक्क्यांच्या जवळ येईल.

धाराशिवमध्ये मोजणी तूर्त थांबली

धाराशिव : जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला  शेतकरी विरोध करीत आहेत.  त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी मोजणी तूर्त थांबवली असल्याचे शेतकऱ्यांसमोर स्पष्ट केले.

टॅग्स :Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गhighwayमहामार्गAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार