शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी शाहीर संभाजी भगत, साताऱ्यात १५ वे संमेलन होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:03 IST

साताऱ्यात २२ वर्षांनंतर संमेलन.., मे महिन्यात दोन दिवस चालणार

सातारा : सातारा शहरात दि. २ आणि ३ मे रोजी १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन होत असून अध्यक्षपदासाठी मराठीतील ख्यातनाम गायक, शाहीर आणि विद्रोही शाहिरी जलशाचे प्रवर्तक संभाजी भगत यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘विद्रोही’चे ज्येष्ठ नेते डॉ. बाबूराव गुरव, ‘विद्रोही’चे मार्गदर्शक व क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲड. सुभाष पाटील आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी दिली.साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. सुहास महाराज फडतरे, कार्याध्यक्ष कॉ. विजय मांडके, सरचिटणीस ॲड. राजेंद्र गलांडे, प्रा. गौतम काटकर आदी उपस्थित होते.शाहीर संभाजी भगत हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाचगणीजवळील महू गावचे आहेत. लहानपणापासूनच गावातील कलावंतांची गायकी ऐकतच मोठे झाले. भजन व भारुडांवर संभाजी भगत याचा कलावंत पिंड पोसला गेला. नंतर पुढे ते मुंबईत गेले. तसेच ते डाव्या चळवळीशी जोडले गेले. संभाजी भगत यांनी अनेक पोवाडे गायले आहेत. राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळालेल्या कोर्ट या चित्रपटातील एक गाणे त्यांनी गायले आहे. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या आगळ्यावेगळ्या अशा नाटकामुळे त्यांना नवी ओळख मिळाली.

लवकरच कार्यक्रम पत्रिका...विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र आणि विद्रोही संमेलन संयोजन समितीच्या वतीने लवकरच साताऱ्यात होणाऱ्या १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहितीही विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव आणि डॉ. सुहास महाराज फडतरे यांनी दिली आहे.

साताऱ्यात २२ वर्षांनंतर संमेलन...सातारा येथे यापूर्वी चौथे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन २००२ मध्ये झाले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव या साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष होते. आता २२ वर्षांनंतर पुन्हा एकदा साताऱ्यात विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आले आहे.विद्रोही साहित्य संमेलनांचा प्रवास...पहिले विद्रोही मराठी साहित्य संमेलन धारावी (मुंबई) येथे पार पडले होते. त्यानंतर कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सावंतवाडी, पंढरपूर, धुळे, सोलापूर, इंदापूर, सांगली, राहुरी, बीड, शहादा, पुणे या ठिकाणी संमेलने झाली आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Shahir Sambhaji Bhagat to Preside Over Rebel Literature Conference

Web Summary : Fifteenth Vidrohi Sahitya Sammelan in Satara will be presided over by Shahir Sambhaji Bhagat. The event will be held on May 2nd and 3rd. After 22 years, Satara will host the Vidrohi Sahitya Sammelan.